शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Sangli Accident News: ताबा सुटून कार दुभाजकावर आदळली, ईश्वरपूरजवळ अपघातात दोघे ठार; लहान मुलासह महिला जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 13:28 IST

अपघातामुळे काहीकाळ वाहतूक ठप्प

ईश्वरपूर : ईश्वरपूर - सांगली रस्त्यावरील तुजारपूर (ता. वाळवा) गावच्या हद्दीतील हनुमान मंदिर परिसरात मोटारीवरील ताबा सुटून ती रस्ते दुभाजकावर आदळून झालेल्या अपघातात दोघे ठार झाले. तर एक लहान मुलगा व महिला जखमी झाली. हा अपघात सोमवारी सकाळी १० च्या सुमारास झाला.राजाराम शिवाजी पाटील (वय ७०) व स्वप्नाली सागर पाटील (वय ३५, दोघे रा. बोरगाव, ता. वाळवा) अशी मृतांची नावे आहेत. तर रियांश पाटील (वय ५) आणि मनीषा पाटील (वय ६५, बोरगाव) अशी जखमींची नावे आहेत. या दुर्घटनेमुळे बोरगाव गावात हळहळ व्यक्त होत होती. जखमींवर ईश्वरपूर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले.राजाराम पाटील हे आपली मोटार (एमएच १० - डीएल ४८४७) घेऊन घरातील इतरांसमवेत आष्टा येथील नातेवाइकांकडे निघाले होते. सकाळी १० च्या सुमारास तुजारपूर गावच्या हद्दीतून जात असताना भरधाव वेगात मोटार चालविताना रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष झाल्याने मोटारीवरील त्यांचा ताबा सुटून ती रस्ते दुभाजकावर आदळली. त्यामध्ये स्वप्नाली पाटील या जागीच ठार झाल्या. तर राजाराम पाटील व इतर दोघे गंभीर जखमी झाले.अपघातस्थळावरून जाणाऱ्या नागरिकांनी घटनेची माहिती पोलिसांना देत जखमींना उपचारासाठी हलवले. या अपघातामुळे सांगली रस्त्यावरील वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती. पोलिसांनी वाहतूक सुरळीत करीत अपघातग्रस्त वाहन बाजूला केले. दरम्यान, रुग्णालयात उपचार सुरू असताना राजाराम पाटील यांचे निधन झाले. दोन्ही मृतांच्या डोक्यास व छातीवर, पोटावर जबर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. या अपघाताबाबत प्रकाश बाळासाहेब पाटील (बोरगाव) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli Accident: Car Hits Divider Near Islampur, Two Dead

Web Summary : Near Islampur, a car accident claimed two lives and injured two, including a child. The car crashed into a divider due to speeding and the driver's inattention. The deceased were identified as Rajaram Patil (70) and Swapnali Patil (35).