शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
3
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
4
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
5
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
6
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
7
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
8
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
9
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
10
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
11
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
12
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
13
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
14
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
15
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
16
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
17
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
18
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
19
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
20
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
Daily Top 2Weekly Top 5

बुधगावमध्ये गॅस गळतीत दोघे जखमी

By admin | Updated: December 19, 2014 00:22 IST

दुर्घटना टळली : तीन ठिकाणी गळती

बुधगाव : बुधगाव (ता. मिरज) येथे मागील दोन दिवसात गॅस सिलिंडर गळतीच्या तीन घटना घडल्या. गॅस गळतीने लागलेली आग आटोक्यात आणताना एका महिलेसह दोघेजण भाजून जखमी झाले. वेळीच आग आटोक्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली.बुधगावात मागील दोन दिवसांपासून घरगुती गॅस सिलिंडरची गळती होऊन सिलिंडरने पेट घेतल्याचे तीन प्रकार घडले. आज, गुरुवारी सकाळी गावभागातील शिंदे गल्लीतील विश्वनाथ मारुती भारती यांच्या पत्नीने स्वयंपाकासाठी सिलिंडर चालू करून शेगडी पेटविली असता, सिलिंडरला आग लागली. प्रसंगावधान राखून घराबाहेर येऊन त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर शेजारील काही तरुणांनी त्यांच्या घरात जाऊन पेटलेल्या सिलिंडरवर वाळू, माती व ओले पोते टाकून आग आटोक्यात आणली. गळती लागलेला सिलिंडर घराबाहेर टाकून दिला. तरुणांच्या प्रसंगावधानामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली. असाच प्रकार गुरव गल्लीतील नारायण कृष्णा पाटील व सुनील बबन कोळी यांच्या घरातही घडला. यापैकी नारायण पाटील यांच्या घरी पत्नी अनुसया व अन्य एक आग आटोक्यात आणताना भाजून जखमी झाले. खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले.सिलिंडर गॅस गळतीचे प्रकार वाढल्याने गृहिणींमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. याबाबत लोकांनी संबंधित गॅस एजन्सीकडे तक्रारी केल्या असून, एजन्सीकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांतून होत आहे. तरी एजन्सीने सिलिंडर तपासूनच वितरित करण्याची मागणी गॅस ग्राहकांतून होत आहे. (वार्ताहर)