सांगलीमध्ये दोनशे रूपयांच्या बनावट नोटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 00:40 IST2019-01-18T00:39:38+5:302019-01-18T00:40:45+5:30

सांगलीतील संजयनगर येथील आठवडा बाजारात बुधवारी रात्री एका अज्ञाताने ग्राहक बनून बाजारातील आठ ते दहा भाजीपाला विक्रेत्यांना दोनशे रूपयांच्या बनावट नोटा देऊन माल खरेदी केला. रात्री उशिरा हिशेब करताना विक्रेत्यांना या नोटांबद्दल संशय आला. त्यांनी जाणकारांना नोटा दाखविल्यानंतर, त्या बनावट असल्याचे

 Two hundred rupees fake notes in Sangli | सांगलीमध्ये दोनशे रूपयांच्या बनावट नोटा

सांगलीमध्ये दोनशे रूपयांच्या बनावट नोटा

ठळक मुद्देभाजी विके्रत्यांना गंडा : सुरक्षा धागा नसलेल्या नोटा आठवडा बाजारात खपविल्या; पोलिसांत तक्रार नाही

सांगली : सांगलीतील संजयनगर येथील आठवडा बाजारात बुधवारी रात्री एका अज्ञाताने ग्राहक बनून बाजारातील आठ ते दहा भाजीपाला विक्रेत्यांना दोनशे रूपयांच्या बनावट नोटा देऊन माल खरेदी केला. रात्री उशिरा हिशेब करताना विक्रेत्यांना या नोटांबद्दल संशय आला. त्यांनी जाणकारांना नोटा दाखविल्यानंतर, त्या बनावट असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. अशा बनावट नोटा खपविणाऱ्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

संजयनगर येथे आठवड्याचा बाजार बुधवारी भरत असतो. नेहमीप्रमाणे बुधवारी बाजार भरला होता. रात्री ९ च्या सुमारास एक अनोळखी ग्राहक आला आणि त्याने येथील बाजारात भाजी विक्रेत्या शालन शेळके यांच्याकडून अर्धा किलो वांगी घेतली व त्यांना दोनशे रूपयांची बनावट नोट दिली. त्याच ग्राहकाने सोनाबाई कोळपे यांच्यासह सुमारे आठ विक्रेत्यांना अशाचप्रकारे बनावट नोटा दिल्या. बाजारात ग्राहकांची गर्दी असल्याने विके्रत्यांनी घाईगडबडीत नोटा तशाच स्वीकारल्या. रात्री उशिरा बाजार संपल्यावर हिशेब करताना भाजी विक्रेत्यांना दोनशे रूपयांच्या नोटेबद्दल शंका वाटली.

काही जाणकार लोकांना या नोटा दाखविल्यानंतर, त्या बनावट असल्याचे दिसून आले. या नोटांमधील हिरव्या व निळ्या रंगात बदलणारा सुरक्षा धागा अस्तित्वात नव्हता. दोनशे रुपयांच्या आकड्यामागे चक्र दिसत नव्हते. हुबेहूब दिसणाºया या नोटांची मोठ्या प्रमाणात छपाई झाली असल्याचीही शक्यता आहे. यामागे एखादी मोठी टोळी असल्याचाही संशय व्यक्त होत आहे. सांगली जिल्ह्यात यापूर्वी अनेकदा बनावट नोटांच्या घटना उजेडात आल्या आहेत.

बनावट नोटाप्रकरणी कारवाई करणार : बोराटे
सांगलीतील संजयनगर येथील आठवडा बाजारात बुधवारी रात्री एका अज्ञाताने ग्राहक बनून बाजारातील आठ ते दहा भाजीपाला विके्रत्यांना दोनशे रूपयांच्या बनावट नोटा देऊन माल खरेदी केला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल. याबाबत विक्रेत्यांनी तक्रार दाखल केल्यानंतर तातडीने चौकशी करण्यात येईल, असे अतिरिक्त पोलीसप्रमुख शशिकांत बोराटे यांनी सांगितले.

सुरक्षेचा प्रश्न गंभीर
संजयनगर येथील आठवडा बाजारात पाकीट मारणे, महिलांची छेडछाड करणे असे प्रकारही घडत आहेत. आता बनावट नोटांचाही प्रकार समोर आला आहे. त्यामुळे सर्वचदृष्टीने येथील बाजार असुरक्षित बनला आहे. त्यामुळे या बाजारात पोलीस बंदोबस्त ठेवावा, अशी मागणी काही विक्रेत्यांनी केली.

Web Title:  Two hundred rupees fake notes in Sangli