शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Sangli Municipal Election 2026: सांगलीत आचारसंहिता भंगाचे दोन गुन्हे दाखल; अवैध दारू, शस्त्र जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 16:04 IST

प्रिंटिंग प्रेस मालकांना सूचना

सांगली : महापालिका निवडणुकीत आतापर्यंत विनापरवाना रॅली तसेच मालमत्ता विरूपण केल्याबद्दल दोन गुन्हे दाखल झाले आहेत. पोलिस प्रशासनाने अवैध दारूसाठा, शस्त्र बाळगल्याबद्दल कारवाई केली आहे. तसेच आतापर्यंत १५९ जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६च्या अनुषंगाने आदर्श आचारसंहितेची कडक अंमलबजावणी सुरू आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक व प्रतिबंधात्मक कारवाई प्रभावीपणे केली जात आहे. तरुण भारत स्टेडियममध्ये कार्यरत आचारसंहिता कक्षामध्ये आजअखेर एकूण ६ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

आचारसंहिता कक्षाकडे प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार विनापरवाना दुचाकी रॅली काढणे तसेच सार्वजनिक मालमत्तेचे विरूपण करणे या प्रकरणात गुन्हे दाखल केले आहेत. उर्वरित चार तक्रारींमध्ये तथ्य न आढळल्याने कायदेशीर प्रक्रियेनंतर त्या निकाली काढण्यात आल्या आहेत. आचारसंहिता कक्षाचे नोडल अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी रघुनाथ पोटे यांनी आजअखेर झालेल्या कार्यवाहीचा सविस्तर अहवाल प्रशासनास सादर केला आहे.

वाचा : भाजपने अंडरएस्टिमेट केल्याने शिंदेसेना सर्व जागा लढणार - शंभूराज देसाई निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस दलाकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. आजअखेर २७.६५ लिटर अवैध दारू जप्त करण्यात आली आहे. त्याची किंमत २० हजार ९१५ इतकी आहे. कोयते बाळगून फिरणाऱ्या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात एकूण १५९ प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या आहेत. विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांना अशा प्रकरणांत कडक कारवाईच्या सूचना दिल्या आहेत.निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, शांततापूर्ण व भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. कोणत्याही राजकीय पक्ष, उमेदवार किंवा समर्थकाने आचारसंहितेचा भंग केल्यास त्यांच्यावर कोणताही दबाव न ठेवता तत्काळ व कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

प्रिंटिंग प्रेस मालकांना सूचनाआचारसंहिता कक्षामार्फत शहरातील प्रिंटिंग प्रेस मालकांची बैठक घेण्यात आली. लोकप्रतिनिधित्व अधिनियमानुसार पोस्टर, बॅनर किंवा हँडबिलवर मुद्रक व प्रकाशकाचे नाव व पत्ता बंधनकारक आहे. तरतुदीचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे

तक्रारीसाठी २४ x ७ सुविधाआदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी तक्रारीसाठी ०२३३-२९९१५०० या दूरध्वनी क्रमांकावर किंवा तरुण भारत स्टेडियममधील आचारसंहिता कक्षास भेट देऊन तक्रार करता येईल. हा कक्ष २४ तास सुरू असेल.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli Election 2026: Two Code of Conduct Violations, Illicit Liquor Seized

Web Summary : Two cases filed in Sangli for violating election code. Illicit liquor, weapons seized. 159 face preventive actions. Transparent, peaceful elections assured.
टॅग्स :Sangli Miraj Kupwad Municipal Corporation Electionसांगली मिरज कुपवड महानगरपालिका निवडणूक २०२६SangliसांगलीMunicipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस