शिरगुप्पी : कर्नाटकातील अथणी तालुक्यातील सत्ती गावाजवळ शनिवारी सायंकाळी मोटार आणि दुचाकी यांच्यात धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दोघा भावांचा मृत्यू झाला. रमजान सनदी (वय २५) व राजू सनदी (१८, असंगी, ता. अथणी) अशी दोघांची नावे आहेत. अथणी पोलिस ठाण्यात रविवारी याबाबत नोंद झाली आहे.रमजान सनदी आणि राजू सनदी हे दोघे भाऊ आहेत. असंगी गावात दोघे राहत होते. दोघेही बांधकाम कामगार म्हणून काम करत होते. शनिवारी दोघेजण नेहमीप्रमाणे बांधकामावर गेले होते. काम संपल्यानंतर ते दुचाकीवरून असंगी गावी परत येत होते. सत्ती गावाजवळ मोटार आणि सनदी यांच्या दुचाकीची जोरदार धडक झाली. या धडकेत रमजान आणि राजू हे गंभीर होऊन जागीच मृत झाले. अपघातात दोन्ही गाड्यांचे नुकसान झाले. अपघातानंतर घटनास्थळी गर्दी जमली होती. अथणी पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. रविवारी अपघातप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, असंगी येथील दोघा भावांचा अपघाती मृत्यू झाल्याबद्दल परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Web Summary : Near Athani, Karnataka, a motorbike collided with a car, killing two brothers, Ramzan and Raju Sanadi, instantly. They were construction workers returning home. Police are investigating the accident.
Web Summary : कर्नाटक के अथानी के पास, एक मोटरबाइक की कार से टक्कर में दो भाइयों, रमजान और राजू सनदी की मौके पर ही मौत हो गई। वे निर्माण श्रमिक थे और घर लौट रहे थे। पुलिस दुर्घटना की जांच कर रही है।