शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक, कुपवाडमध्ये दोघे जागीच ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2024 12:03 IST

डोक्याला गंभीर दुखापत होऊन दोघांचा जागीच मृत्यू

कुपवाड : शहरातील माधवनगर ते मिरज रस्त्यावरील चाणक्य चौकालगत असलेल्या एका शाळेसमोर दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली. या धडकेत दोन्ही दुचाकी चालक जागीच ठार झाले. हा अपघात गुरुवारी रात्री साडेआठ वाजता झाला. पंकज सुभाष लोहार (वय २२, रा. सुतार गल्ली, शामनगर, कुपवाड) व किरण हणमंत कोळी (वय १७, रा. मंगलमूर्ती काॅलनी, गल्ली नंबर १, कुपवाड) अशी मृतांची नावे आहेत.अपघाताबाबत मिळालेली माहिती अशी, गुरुवारी रात्री किरण कोळी हा दुचाकीवरून (एमएच १० बीडब्ल्यू ४९०७) चाणक्य चौकातून मिरजेकडे जात होता. तर पंकज लोहार हा दुचाकी (एमएच १० डीएस ९७६६) वरून मिरजेहून घरी जात होता. चाणक्य चौकाजवळील एका शाळेसमोरील रस्त्यावर या दोन्ही दुचाकीची समोरासमोर धडक झाली. या धडकेत दोघेजण डांबरी रस्त्यावर आदळून गंभीर जखमी झाले. त्यांना डोक्याला गंभीर दुखापत होऊन किरण कोळी व पंकज लोहार या दोघांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच शहरातील आयुष हेल्पलाईन टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली.रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दोघांनाही सांगलीतील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. परंतु दोघांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. अपघाताची माहिती मिळताच कुपवाड एमआयडीसी व संजयनगर या दोन्ही पोलिस ठाण्यातील कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. कुपवाड एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. अपघातातील दोन्ही दुचाकी ताब्यात घेतल्या.

दोघांच्या मृत्यूबद्दल हळहळघटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार मृत पंकज लोहार हा सुतारकाम करीत होता. तर किरण कोळी हा एका हाॅटेलमध्ये कामाला होता. दोघा युवकांचा मृत्यू झाल्याने शहरातील श्यामनगर आणि मंगलमूर्ती काॅलनी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :SangliसांगलीAccidentअपघातDeathमृत्यू