शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

घरफोडी करणाऱ्या दोन बांगलादेशींना सांगलीत अटक, १२ लाखांचा ऐवज जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 19:39 IST

सांगली : बेकायदेशीररित्या भारतात वास्तव्यास राहून घरफोड्या करणाऱ्या दोन बांगलादेशी चोरट्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली. आरोपींकडून ...

सांगली : बेकायदेशीररित्या भारतात वास्तव्यास राहून घरफोड्या करणाऱ्या दोन बांगलादेशी चोरट्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली. आरोपींकडून १२ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यांनी पाच घरफोड्यांची कबुली दिली आहे. हिमेल फरमान सोनार (वय ३५) आणि पोरोश शोयदुल चोकदार (वय २७, दोघे रा. रुस्तमनगर, कॉलेजपारा, ता. पारबतीपुरा, जि. दिनाजपूर, रंगपूर विभाग, बांगलादेश) अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महादेव पोवार यांच्या पथकाने घरफोडी करणाऱ्या संशयितांचा शोध सुरू केला होता. दरम्यान, मंगळवारी पोलिसांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, दोन संशयित चोरीचे सोन्या-चांदीचे दागिने विक्रीसाठी झुलेलाल मंदिर परिसरातून कोल्हापूर रोडकडे जाणार आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी झुलेलाल मंदिर परिसरात सापळा रचला. तेथे दुचाकीजवळ थांबलेल्या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी आपली ओळख सांगितली. अंगझडतीत हिमेल सोनार याच्याकडून सोन्याचे दागिने, मोबाईल, बांगलादेशी ओळखपत्र व रोख रक्कम तर पोरोश चोकदार याच्याकडील सॅकमध्ये चांदीचे दागिने आढळून आले. दोघांकडे भारतात राहण्याचा कोणताही वैध परवाना नसल्याचे उघड झाले. आरोपींना जप्त मुद्देमालासह पुढील तपासासाठी सांगली शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून अधिक तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पोवार व त्यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.

पडक्या इमारतीत वास्तव

संशयित हिमेल फरमान सोनार, पोरोश शोयदुल चोकदार हे दोघे गेल्या दीड वर्षापासून मिरज रेल्वे स्थानकाजवळील पडक्या इमारतीत राहत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. सांगलीतील सिव्हिल हॉस्पिटल परिसर, संजयनगर, तासगाव व पलूस येथे बंद घरांचे कडीकोयंडे तोडून चोरी केल्याची कबुलीही त्यांनी दिली.

English
हिंदी सारांश
Web Title : Two Bangladeshi Burglars Arrested in Sangli, Stolen Goods Recovered

Web Summary : Sangli police arrested two Bangladeshi nationals illegally residing in India for burglaries. They confessed to five break-ins, with recovered stolen goods worth ₹12.3 lakhs. The accused lived near Miraj railway station and targeted homes in Sangli, Tasgaon, and Palus.