शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

सांगलीत वर्चस्व वादातून दोघांवर हल्ला; एकजण गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 13:00 IST

शामरावनगर परिसरात गुन्हेगारीत वाढ

सांगली : शहरातील शामराव नगरमधील स्वराज्य चौकात दोन गटांत वर्चस्वातून वाद उफाळून आला. सोमवारी रात्री नऊच्या सुमारास दोघा तरुणांवर काठीने आणि हत्याराने हल्ला करण्यात आला. यामध्ये एकजण गंभीर जखमी झाला. त्याच्या डोक्यात गंभीर दुखापत झाली आहे. त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल केले आहे. सांगली शहर पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद झाला नव्हता.घटनास्थळी मिळालेली माहिती अशी, शामराव नगरमधील स्वराज्य चौकात सोमवारी बाजार भरला होता. रात्री नऊच्या सुमारास वर्चस्ववादातून दोन तरुणांना काठ्यांसह धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. त्यामुळे परिसरातील लोकांची पळापळ झाली. हल्ल्यामध्ये एकाच्या डोक्यात वर्मी वार झाल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. दुसऱ्या तरुणाच्या छातीवर मारहाण झाली. दोघे जखमी झाल्यानंतर हल्लेखोर पळाले.त्यानंतर तातडीने भागातील नागरिकांनी जखमींना सिव्हिलमध्ये उपचारासाठी दाखल केले. हल्ल्याची माहिती मिळताच सांगली शहर पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उपनिरीक्षक महादेव पोवार यांच्या पथकाने हल्लेखोरांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. हल्ल्यानंतर परिसरात तणावाचे वातावरण होते. अनेकांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. त्यामुळे मोठी गर्दी झाली होती.

शामरावनगर परिसरात गुन्हेगारीत वाढशामरावनगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी वाढली आहे. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी नशेखोरांसह परिसरातील गुन्हेगारीचा बीमोड करावा, अशी मागणी होत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli: Two Attacked Over Supremacy; One Seriously Injured

Web Summary : In Sangli, a clash over dominance led to an attack on two young men with weapons. One sustained severe head injuries and is hospitalized. Police are investigating the incident in Shamrao Nagar, where rising crime is causing concern.