शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

भाजी विक्रेत्याच्या खुनातील दोघांना अटक; आरोपींनी दिली खुनाची कबुली

By घनशाम नवाथे | Updated: June 8, 2025 14:35 IST

सांगली शहर पोलिस ठाण्याची कारवाई

घनशाम नवाथे

सांगली : येथील शंभरफुटी रस्त्यावर भाजी विक्रेता महेश प्रकाश कांबळे (वय ४०, रा. आंबा चौक, यशवंतनगर) याचा खून केल्याप्रकरणी मुख्य संशयित मुजाहिद फिरोज शेख (वय २४), साथीदार जय सूरज पाटील (वय २१, दोघे रा. साई मंदिरजवळ, संजयनगर) या दोघांना सांगली शहर पोलिसांनी अटक केली. दोघांवर खून आणि ‘ॲट्रॉसिटी’ चा गुन्हा दाखल आहे. दोघांनी खुनाची कबुली दिली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मृत महेश कांबळे याने आर्थिक देवघेवीतून २०२१ मध्ये फिरोज ऊर्फ बडे शेख याचा खून केला होता. या खुनप्रकरणात तो २०२३ मध्ये जामिनावर मुक्त झाला. मृत फिरोजचा मुलगा मुजाहिद याला बापाच्या खुनामुळे महेशवर राग होता. तशातच महेश याचे मुजाहिदच्या नात्यातील एका महिलेशी अनैतिक संबंध सुरू होते. त्यामुळे मुजाहिद याचा राग आणखीनच धुमसत होता. तो महेशचा काटा काढण्याची संधी शोधत होता.

मुजाहिद आणि त्याचा साथीदार जय पाटील याने महेशचा काटा काढण्याचे ठरवले. दोघेजण पाठलागावर होते. दि. ५ रोजी सकाळी महेश हा शंभरफुटी रस्त्यावरील भाजीपाला बाजारात आला होता. महेश वाटेत लघुशंकेसाठी थांबला असता पाठलागावर असलेल्या मुजाहिद व जय याने त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला चढवला. पोटात, डोक्यात धारदार शस्त्राने वार झाल्यानंतर महेश मृत झाला.

खुनानंतर संशयित दोघेजण तीन दिवस पोलिसांना चकवा देत होते. शहर ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे यांनी गुन्हे प्रकटीकरणच्या दोन पथकांना संशयितांचा माग काढण्याबाबत सूचना दिल्या होत्या. उपनिरीक्षक महादेव पोवार, अंमलदार संदीप पाटील, संतोष गळवे, गौतम कांबळे यांनी संशयित दोघे इनाम धामणी येथील विठ्ठल पाटील कॉलेजजवळ राष्ट्रीय महामार्गावर येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार परिसरात शनिवारी रात्री सापळा रचला. तेवढ्यात पुलाखाली दोघेजण बसमधून येऊन थांबल्याचे दिसले. पोलिसांना पाहून ते पळून जावू लागले. तेव्हा पाठलाग करून पकडले. दोघांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी खुनाची कबुली दिली.

गुन्हे प्रकटीकरणकडील अंमलदार सतिश लिंबळे, सिकंदर तांबोळी, विनायक शिंदे, रफिक मुलाणी, संतोष गळवे, योगेश सटाले, गणेश कोळेकर, संदीप कोळी, प्रशांत पुजारी, विशाल कोळी, योगेश हाक्के यांच्या पथकाने कारवाईत सहभाग घेतला.

कसून तपास करणार

पोलिस उपअधीक्षक प्रणिल गिल्डा म्हणाले, महेश कांबळे याच्या खुनातील दोघा संशयितांना अटक केली आहे. त्यांची कसून चौकशी केली जाईल. त्यांचा आणखी कोणी साथीदार आहे काय? त्यांना पलायनासाठी कोणी मदत केली काय? याचा तपास केला जाईल.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारी