हिंगणगाव खुर्दला शेतात लावलेला अडीच लाखांचा गांजा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:26 IST2021-04-18T04:26:34+5:302021-04-18T04:26:34+5:30

हिंगणगाव (खुर्द, ता. कडेगाव) येथे शेतात गांजाची बेकायदा लागवड करणाऱ्या एकाला कडेगाव पोलिसांनी अटक केली. संभाजी ...

Two and a half lakh cannabis seized from Hingangaon Khurd | हिंगणगाव खुर्दला शेतात लावलेला अडीच लाखांचा गांजा जप्त

हिंगणगाव खुर्दला शेतात लावलेला अडीच लाखांचा गांजा जप्त

हिंगणगाव (खुर्द, ता. कडेगाव) येथे शेतात गांजाची बेकायदा लागवड करणाऱ्या एकाला कडेगाव पोलिसांनी अटक केली. संभाजी सदाशिव जाधव (५९) असे त्याचे नाव असून, प्लास्टिकच्या तीन पोत्यांमध्ये दुमडून ठेवलेली २ लाख ५७ हजार ८० रुपये किमतीची गांजाची झाडे जप्त केली.

हिंगणगाव खुर्द येथील संभाजी जाधव याने शेतात वांग्याच्या पिकाच्या कडेला केळीलगत ठिकठिकाणी गांजाची बेकायदा झाडे लावली होती.

कडेगावचे पोलीस निरीक्षक पांडुरंग भोपळे यांच्या

मार्गदर्शनाखाली संदीप साळुंखे

यांच्या नेतृत्वाखालील पथकाने शुक्रवारी छापा टाकला.

यावेळी पाच ते सहा फूट उंचीची गांजाची झाडे दुमडून प्लास्टिकच्या तीन पोत्यांमध्ये ठेवलेली आढळली. त्यांची किंमत २ लाख ५७ हजार ८० रुपये आहे. या पोत्यांचे वजन २५ किलो ७०८ ग्रॅम आहे. पोलीस पथकाने गांजाची झाडे ताब्यात घेतली आणि संभाजी जाधव यास अटक केली आहे.

फोटो ओळ :

हिंगणगाव (खुर्द) येथे पोलिसांनी छापा टाकून गांजाची पोती जप्त केली व संशयित संभाजी जाधव

याला अटक केली. पोलीस निरीक्षक पांडुरंग भोपळे, संदीप साळुंखे यांच्यासोबत पोलीस पथक.

Web Title: Two and a half lakh cannabis seized from Hingangaon Khurd