आटपाडीत व्यापाऱ्यांकडून दोघांचे अपहरण; बेदम मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 12:25 AM2018-11-29T00:25:14+5:302018-11-29T00:25:18+5:30

आटपाडी : सोन्याची तस्करी करताना ८२ लाख रुपयांचे अडीच किलो चोरीचे सोने घेतल्याच्या संशयावरुन बनपुरी (ता. आटपाडी) येथील दोघांचे ...

Two abducted by traders from Atpadi; Breathless assault | आटपाडीत व्यापाऱ्यांकडून दोघांचे अपहरण; बेदम मारहाण

आटपाडीत व्यापाऱ्यांकडून दोघांचे अपहरण; बेदम मारहाण

Next

आटपाडी : सोन्याची तस्करी करताना ८२ लाख रुपयांचे अडीच किलो चोरीचे सोने घेतल्याच्या संशयावरुन बनपुरी (ता. आटपाडी) येथील दोघांचे व्यापाºयांनी
अपहरण करुन त्यांना बेदम मारहाण केली. मुंबई पोलीस असल्याची बतावणी करून दोन आलिशान मोटारीतून आलेल्या नऊजणांनी एका महिलेलाही मारहाण केली आहे. आटपाडी पोलिसांनी त्यांचा सिनेस्टाईलने पाठलाग करून, अपहरण केलेल्यांची सुटका केली.
याप्रकरणी आटपाडी पोलीस ठाण्यात अपहरण केलेल्या अमोल ब्रह्मदेव यमगर आणि अजित ब्रह्मदेव यमगर व त्यांची आई अनुसया यमगर यांनी फिर्याद दिली आहे. विकास कदम (रा. कौठुळी, ता. आटपाडी), मदन (पूर्ण नाव माहीत नाही, रा. कौठुळी, ता. आटपाडी), कैलास वस्ताद गोरड (रा. वीरकरवाडी, ता. माण), अक्षय गायकवाड (रा. बलवडी, ता. खानापूर), तुषार चिमाजी वीरकर (रा. वीरकरवाडी, ता. माण), श्रीनाथ ऊर्फ श्रीकांत धायगुडे (रा. बलवडी, ता. खानापूर), संजय महादेव पुकळे (रा. बनपुरी), महेश जाधव (रा. बेणापूर, ता. खानापूर), अतुल जाधव (रा. बेणापूर, ता. खानापूर) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोलकात्ता येथील काही व्यापाºयांचे सोने काही दिवसांपूर्वी प्रदीप पाटील (रा. बनपुरी, ता. आटपाडी) या कामगाराच्या ताब्यातून चोरीस गेले होते. हे सोने अमोल यमगर व अजित यमगर यांनी घेतल्याचा संशय संबंधित व्यापाºयांना होता. या वादातून बुधवारी दुपारी आपण मुंबई पोलीस असल्याची बतावणी करत दोन आलिशान मोटारीतून नऊजण आटपाडीत आले. त्यांनी बनपुरीतून अमोल व अजित यमगर यांना दमदाटी करीत ताब्यात घेतले. यावेळी अमोल व अजित यांची आई अनुसया यमगर यांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला असता, अपहरणकर्त्यांनी त्यांनाही मारहाण केली. यानंतर अपहरणकर्ते अमोल व अजित यांना घेऊन तडवळे येथील एका शेतात आले. तेथे चोरीचे सोने परत देण्याची मागणी करीत अजित व अमोल यांना बेदम मारहाण केली.
दरम्यान, याबाबतची माहिती अनुसया यमगर यांनी आटपाडी पोलिसांना दिली. आटपाडी पोलिसांनी तात्काळ खासगी वाहनाने तडवळे येथे जाऊन अपहरणकर्त्यांचा पाठलाग सुरू केला. दरम्यान,
अमोर याला तडवळे येथील शेतात सोडून अपहरणकर्ते अजित यमगर यांना घेऊन दोन वाहनांसह पळून जात होते.
पोलिसांनी तडवळे ते साई मंदिरापर्यंत त्यांचा पाठलाग केला. साईमंदिराजवळ एक वाहन रोखण्यात पोलिसांना यश आले. या वाहनात असलेले अजित यमगर यांची सुटका करून चौघा अपहरणकर्त्यांना ताब्यात घेतले, तर दुसºया वाहनातील अपहरणकर्ते पळून जाण्यात यशस्वी झाले. अपहरणकर्त्यांच्या मारहाणीत बेशुद्ध झालेल्या अजित यमगर यांना पोलिसांनी उपचारासाठी शासकीय रूग्णालयात दाखल केले. अपहरणकर्त्यांकडील आलिशान मोटार (क्र. एमएच ०६ एडब्ल्यू ६४६६) ताब्यात घेतली आहे. अधिक तपास सहायक निरीक्षक सुधाकर देढे करीत आहेत.

Web Title: Two abducted by traders from Atpadi; Breathless assault

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.