मिरज : इंटरनेटवरून स्टेट बँकेचे अॅप्लिकेशन डाऊनलोड करणाऱ्या मिरजेतील कापड व्यापाऱ्यास अज्ञाताने २३ हजारांचा गंडा घातला. याबाबत अहमद रझा शब्बीर खाकू (रा. सुंदरनगर) यांनी शहर पोलिसांत तक्रार दिली आहे. कपड्याचे दुकान असलेल्या शब्बीर खाकू यांचे स्टेट बँकेत खाते आहे. शब्बीर यांचा मुलगा अहमदरझा याने इंटरनेटवरून स्टेट बँकेचे ई-पासबुक डाऊनलोड करण्यासाठी वडिलांच्या स्टेट बँकेतील खात्याची संपूर्ण माहिती भरली. त्यांच्या बँक खात्यातून २३ हजार रक्कम काढल्याचा मेसेज आला. (वार्ताहर)
तेवीस हजारांचा व्यापाऱ्यास गंडा
By admin | Updated: January 4, 2015 00:57 IST