शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
3
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
4
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
5
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
6
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
7
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
8
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
9
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
10
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
11
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
12
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
13
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
14
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
15
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
16
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
17
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
18
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
19
उपनगरांतील मतदार दिलदार, शहरात कंजुषी; मुंबईतील सर्व मतदारसंघांचे आकडे काय सांगतात...
20
दौडा दौडा... भागा भागा सा... प्रचार करताना दमछाक

कोंजवडे ते माळवाडी घाटात ट्रॅक्टर दरीत कोसळून चालकासह दोघे ठार-ट्रॉलीचाही चक्काचूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2018 8:57 PM

पाटण तालुक्यातील तारळे परिसरातील कोंजवडे ते माळवाडी गावच्या हद्दीतून जाणाऱ्या घाट रस्त्यावरून चालकाचा ताबा सुटल्याने ट्रॅक्टर ट्रॉलीसह घाटातून सुमारे दोनशे फूट खोल दरीत कोसळला.

ठळक मुद्दे भीषण अपघात

उंब्रज : पाटण तालुक्यातील तारळे परिसरातील कोंजवडे ते माळवाडी गावच्या हद्दीतून जाणाऱ्या घाट रस्त्यावरून चालकाचा ताबा सुटल्याने ट्रॅक्टर ट्रॉलीसह घाटातून सुमारे दोनशे फूट खोल दरीत कोसळला. या भीषण अपघातात सांगली जिल्'ातील ट्रॅक्टर चालकासह एकजण जागीच ठार झाला. बुधवार, दि. ६ रोजी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. यात ट्रॅक्टर व ट्रॉलीचा चक्काचूर झाला.

ट्रॅक्टर चालक विलास जायगुंडा कराळे (वय २६), इराप्पा दशरथ खरात (२५ दोघे रा. तिकुंडी करेवाडी, ता. जत, जि. सांगली, सध्या रा. कोर्टी, ता. कºहाड) अशी अपघातात जागीच ठार झालेल्या युवकांची नावे आहेत.याबाबत तारळे दूरक्षेत्राच्या पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सांगली जिल्'ातील जत तालुक्यातील तिकुंडी करेवाडी गावातील काही कुटुंबे गेल्या काही वर्षांपासून कोर्टी येथे वास्तव्यास आहेत. ते शेणखत विक्रीचा व्यवसाय करतात. त्या कुटुंबातील सदस्य पाटण तालुक्यातून शेणखत खरेदी करून ते कºहाड तालुक्यातील बागायतदार शेतकºयांना विक्री करतात. नेहमीप्रमाणे ते सर्वजण बुधवारी दोन ट्रॅक्टर व ट्रॉली घेऊन माळवाडी येथे शेणखत भरण्यासाठी निघाले होते. दरम्यान, ट्रॅक्टर (एमएच १० ए वाय २८०५) मध्ये चालक विकास कराळे व इराप्पा खरात हे दोघे बसले होते. तर दुसºया ट्रॅक्टरमध्ये इतर जण बसले होते.

रात्री बारा वाजण्याच्या सुमारास सर्वजण दोन ट्रॅक्टरमधून कोंजवडे ते माळवाडी गावच्या हद्दीतील घाटातील मध्य वळणावर आले. घाटाच्या मध्यावर आल्यानंतर एका धोकादायक वळणावरून जात असताना चालक विलास कराळे यांचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटला आणि ट्रॅक्टर ट्रॉलीसह दोनशे फूट दरीत खाली कोसळला. यात दोघे जागीच ठार झाले. पुढील ट्रॅक्टर अंधारातून दरीत कोसळण्याचा आवाज झाल्यानंतर पाठीमागून येत असलेल्या ट्रॅक्टरवरील युवकांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. त्यांचा आवाज ऐकून परिसरातील भुडकेवाडी (वरची) येथील काही युवकांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच भुडकेवाडीतील युवकांनी माळवाडी, कडवे बुद्रुक येथील ग्रामस्थांना फोनवरून माहिती दिली असता त्या ठिकाणी दोन्ही गावांतील ग्रामस्थ आले.

घटनेची माहिती मिळताच तारळे पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक एम. के. आवळे, हवालदार पी. एम. मोहिते, वाघ, नलवडे हे घटनास्थळी दाखले झाले. त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने खोल दरीत कोसळलेल्या ट्रॅक्टरमधील युवकांचे मृतदेह बाहेर काढले. सुमारे चार तास मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू होते. अधिक तपास पोलीस हवालदार मुरलीधर अवघडे करत आहेत या अपघाताची खबर बापू दशरथ खरात (रा. तिकुंडी, ता. जत) यांनी उंब्रज पोलीस ठाण्यात दिली आहे.स्थानिक युवकांकडून मदतकार्यपहाटेच्या सुमारास युवक, ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांनी दोन युवकांचे मृतदेह दरीतून बाहेर काढले. दरम्यान घटनास्थळी खोल दरी असल्याने ट्रॅक्टरचे तुकडे होऊन ते दरीत विखुरले होते. रात्रीच्या अंधारात घाटातील वळणावर निष्काळजीपणे ट्रॅक्टर चालवल्याबद्दल स्वत:सह एकाच्या मृत्यूस कारणीभूत होऊन ट्रॅक्टर व ट्रॉलीचे सात लाख रुपयांचे नुकसान केल्याबद्दल मयत चालकावर पोलिसांत गुन्हा दाखल आहे. 

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAccidentअपघात