इस्लामपूर पालिकेच्या प्रवेशद्वारातील झाड कोसळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:32 IST2021-08-18T04:32:29+5:302021-08-18T04:32:29+5:30
इस्लामपूर पालिकेच्या कमानीच्या आतल्या बाजूस उन्मळून पडलेले झाड. लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : इस्लामपूर नगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या कमानीजवळ २० ...

इस्लामपूर पालिकेच्या प्रवेशद्वारातील झाड कोसळले
इस्लामपूर पालिकेच्या कमानीच्या आतल्या बाजूस उन्मळून पडलेले झाड.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : इस्लामपूर नगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या कमानीजवळ २० वर्षांपासून असणारे गुळभेंडीचे झाड उन्मळून पडले. या झाडासमोरच वाहनांमध्ये पिण्याचे पाणी भरण्याची व्यवस्था आहे. मात्र हे झाड कोसळताना त्या परिसरात सुदैवाने वाहने अथवा कर्मचारी नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र झाडाच्या बुंध्याजवळ असणारी पाईपलाईन फुटली होती.
रात्रीपासून पावसाची रिपरिप सुरू होती. २० वर्षांपूर्वीचे हे झाड गेल्या काही दिवसांपासून फांद्याच्या ओझ्याने एका बाजूला झुकले होते. त्यातच मंगळवारी पहाटेच्या दरम्यान हे झाड मुळातूनच उन्मळून पडले. पालिकेत ये-जा करण्याच्या मुख्य मार्गावरच झाड पडल्याने स्वच्छता विभागाकडील कचरा घंटागाड्या आणि इतर वाहने बाहेर काढण्यास वेळ झाला होता. पालिकेच्या जेसीबीने या झाड्यांच्या फांद्या मोडून काढत मुख्य बुंधा बाजूला केल्यावर या मार्गावरील वाहतूक पूर्ववतपणे सुरू झाली.