‘सिव्हील’मध्ये नऊ लाख रूग्णांवर उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:21 AM2021-01-09T04:21:11+5:302021-01-09T04:21:11+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क सांगली : गेले संपूर्ण वर्ष कोरोनाच्या सावटाखाली गेल्यानंतर आता दिलासादायक आकडेवारी समोर येत आहे. दक्षिण महाराष्ट्रासह ...

Treatment of nine lakh patients in ‘Civil’ | ‘सिव्हील’मध्ये नऊ लाख रूग्णांवर उपचार

‘सिव्हील’मध्ये नऊ लाख रूग्णांवर उपचार

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

सांगली : गेले संपूर्ण वर्ष कोरोनाच्या सावटाखाली गेल्यानंतर आता दिलासादायक आकडेवारी समोर येत आहे. दक्षिण महाराष्ट्रासह कर्नाटकातील गोरगरीब रूग्णांसाठी सांगलीचे शासकीय रूग्णालय नेहमीच आधार ठरले असून कोरोना कालावधीतही ‘नॉन कोविड’ उपचाराची सोय केली होती. त्यामुळेच गेल्या तीन वर्षात आठ लाख ८४ हजार ७२४ रूग्णांवर उपचार केले गेले आहेत.

सांगलीच्या शासकीय रूग्णालयात दरवर्षी सरासरी साडे तीन लाख रूग्णांवर उपचार केले जातात. २०२० मध्ये पहिल्या दोन महिन्यांनंतर कोरोना स्थिती वाढल्याने मिरजेच्या शासकीय रूग्णालयास कोविड रूग्णालयाचा दर्जा देण्यात आला. त्यामुळे कोरोना व्यतिरिक्त इतर आजारावरील उपचारास सांगली रूग्णालयास प्राधान्य देण्यात आले होते. सप्टेंबरच्या दरम्यान, कोरोनाचा प्रार्दूभाव वाढल्यानंतर सांगलीतही कोविड उपचाराची सोय करण्यात आली. त्यामुळे वर्षभरात दोन लाख ३० हजार ३३२ रूग्णांवर उपचार केले गेले आहेत. तीन वर्षांपेक्षा ही आकडेवारी कमी असलीतरी गरजू रूग्णांसाठी हे उपच्रार महत्त्वाचे ठरले आहेत.

सिव्हीलची गेल्या तीन वर्षातील ‘ओपीडी’ पावणे नऊ लाखांच्या दऱम्यान असताना, १ लाख १९ हजार १७५ रूग्णांना दाखल करून घेत उपचार करण्यात आले आहेत. कोरोना कालावधीतही या रूग्णांसाठी सांगलीत सोय करण्यात आली होती. गेल्या तीन वर्षातील सर्वाधिक ‘आयपीडी’ कोरोना कालावधीत झाल्याने शासकीय रूग्णालयातील उपचार व त्यावरील सर्वसामान्यांच्या विश्वास अधिक दृढ झाला आहे.

चौकट

या वर्षात तीन वर्षातील सर्वाधिक ’आयपीडी’

गेल्या वर्षी मार्च महिन्यात जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला आणि आरोग्य यंत्रणा कामाला लागली. प्रशासनाने केलेल्या नियोजनानुसार मिरजेत कोविड उपचार तर सांगलीत नॉन कोविड उपचाराचे नियोजन झाले. त्यामुळेच २०१८ साली ४१ हजार ५१५, २०१९ मध्ये ३८ हजार ३२० आणि २०२० मध्ये ३९ हजार ३४० रूग्णांना रूग्णालयात दाखल करून घेत त्यांच्यावर उपचार करण्यात आले.

चौकट

ओपीडीमधील रूग्णांची संख्या

२०२० २०१९ २०१८

जानेवारी २९७६२ २६२९५ ३००३५

फेब्रुवारी २५७९८ २५०७५ २६७६६

मार्च २०८९९ २४७८२ २८९१८

एप्रिल ११०६९ २४६४६ २६७०८

मे १६४४८ २७७१० २८३९८

जून २००२६ २६६३९ २५४७४

जुलै १५२५१ २९०२८ २७००७

ऑगस्ट १५४७० २८६७१ २६३७२

सप्टेंबर १५५११ २८६४४ २६७८७

ऑक्टोबर १७६५६ २८०८२ २८२५५

नोव्हेंबर १९०३२ ३१६४३ २३८९०

डिसेंबर २३४१० २७८३३ २६७३४

Web Title: Treatment of nine lakh patients in ‘Civil’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.