शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

सांगली ते सोलापूर प्रवास महागला, पथकराचे नवे दर लागू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 16:53 IST

सांगली : रत्नागिरी - नागपूर महामार्गावरील पथकरामध्ये वाढ करण्यात आली आहे. मंगळवारपासून (दि. १ एप्रिल) ती अंमलात येणार आहे. ...

सांगली : रत्नागिरी - नागपूर महामार्गावरील पथकरामध्ये वाढ करण्यात आली आहे. मंगळवारपासून (दि. १ एप्रिल) ती अंमलात येणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सोमवारी तशी घोषणा केली.रत्नागिरी - नागपूर महामार्ग क्रमांक १६६ वरील बोरगाव (ता. कवठेमहांकाळ), अनकढाळ आणि इचगाव (जि. सोलापूर) या तीनही पथकर नाक्यांवर मंगळवारपासून वाढीव दराने पथकर भरावा लागेल. बोरगाव पथकर नाक्यावरील पथकर अन्य दोन नाक्यांच्या तुलनेत जास्त आहे. या नाक्यावरील पथकर ६५.९४४ किलोमीटर अंतरासाठीचा आहे.बोरगाव नाक्यावरील १ एप्रिलपासूनची करआकारणी अशी : (एकेरी, दुहेरी, मासिक पास) : कार, जीप, प्रवासी व्हॅन, हलक्या मोटारी - १२०, १८०, ३,९६५. हलकी मालवाहू वाहने, मिनी बस - १९०, २९०, ६,३९५. ट्रक, बस - ४००, ६०५, १३,४१०. व्यावसायिक वाहने - ४४०, ६६०, १४,६३५. खोदकाम करणारी यांत्रिकी वाहने - ६३०, ९४५, २१,०२५. सात ॲक्सलपेक्षा मोठी अवजड वाहने - ७७०, १,१५०, २५,५९५.अनकढाळ नाक्यावरील नवी करआकारणी अशी : एकेरी, दुहेरी, मासिक : कार, जीप, प्रवासी व्हॅन, हलक्या मोटारी - ११०, १६५, ३,७००. हलकी मालवाहू वाहने, मिनी बस - १८०, २७०, ५,९६५. ट्रक, बस - ३७५, ५६५, १२,५१५. व्यावसायिक वाहने - ४१०, ६१५, १३,६६०. खोदकाम करणारी यांत्रिकी वाहने - ५९०, ८८५, १९,६२०. सात ॲक्सलपेक्षा मोठी अवजड वाहने - ७१५, १०७५, २३,८८५. नाक्याच्या टप्प्यातील ६३.०९५ किलोमीटर प्रवासासाठी हा पथकर आहे. सध्याच्या सुधारित पथकराला रस्ता मंत्रालयाने २५ मार्च रोजी मान्यता दिली.७,८४० कोटी रुपये खर्चप्राधिकरणाने म्हटले आहे की, सांगली ते सोलापूर महामार्गासाठी ७ हजार ८४० कोटी रुपये खर्च आला आहे. या भांडवली खर्चाच्या वसुलीनंतर पथकर ४० टक्क्यांपर्यंत कमी केला जाईल.

स्थानिकांना ३५० रुपयांचा पासपथकर नाक्यापासून २० किलोमीटर परिघाच्या गावांतील स्थानिक बिगर व्यावसायिक वाहनांना महिन्याकाठी ३५० रुपयांचा पास काढावा लागेल. हा पास रद्द करून मोफत प्रवासाची सवलत द्यावी, यासाठी बोरगाव परिसरातील गावे संघर्ष करीत आहेत. पण, त्याबाबत सकारात्मक निर्णय अद्याप झालेला नाही. या महामार्गावर १६ ऑगस्ट २०२२ रोजी पथकर वसुली सुरू झाली, तेव्हापासून प्रत्येक १ एप्रिलला त्यामध्ये वाढ केली जाते.

टॅग्स :SangliसांगलीSolapurसोलापूरhighwayमहामार्ग