शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

अलीबाग, सिंधुदुर्ग व साताऱ्यासाठी 144 डॉक्टरांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 12:18 IST

Hospital Doctors Sangli : ऐन कोविड काळात मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ३७ डॉक्टरांच्या बदल्या सातारा व सिंधुदुर्ग वैद्यकीय महाविद्यालयाकडे केल्या आहेत. बदलीच्या ठिकाणी तात्काळ रुजू होण्याचेही आदेश आहेत. यामुळे कोरोना कामावर प्रतिकूल परिणाम होण्याची भिती व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देअलीबाग, सिंधुदुर्ग व साताऱ्यासाठी 144 डॉक्टरांच्या बदल्यामुंबई, कोल्हापुरातूनही बदल्या

संतोष भिसेसांगली : ऐन कोविड काळात मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ३७ डॉक्टरांच्या बदल्या सातारा व सिंधुदुर्ग वैद्यकीय महाविद्यालयाकडे केल्या आहेत. बदलीच्या ठिकाणी तात्काळ रुजू होण्याचेही आदेश आहेत. यामुळे कोरोना कामावर प्रतिकूल परिणाम होण्याची भिती व्यक्त होत आहे.वैद्यकीय शिक्षण व अ‍ौषधी द्रव्य विभागाने सोमवारी संध्याकाळी बदल्यांचे आदेश काढले. बदल्या झालेल्यांत अनेक वरिष्ठ व कोविड उपचारांमध्ये महत्वाची भूमिका असणाऱ्या डॉक्टरांचा समावेश आहे. त्याशिवाय पुण्यातील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील नऊ व सोलापुरातील डॉ. वैशंपायन स्मृती महाविद्यालयातील दोघा डॉक्टरांनाही साताऱ्याला पाठविले आहे.

मिरजेतील बदल्या झालेले सर्वच डॉक्टर कोविडमध्ये महत्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळत आहेत. काहीजण मिरजेत तर उर्वरीत सांगली शासकीय रुग्णालयात काम करताहेत. सर्वजण सहयोगी आणि सहाय्यक प्राध्यापक आहेत. सातारा वैद्यकीय महाविद्यालयात अध्यापक म्हणून त्यांनी काम करणे अपेक्षित आहे. अधिष्ठात्यांनी त्यांना तात्काळ कार्यमुक्त करावे असे सहसचिव शिवाजी पाटणकर यांनी आदेशात म्हंटले आहे.साताऱ्यात १०० विद्यार्थी क्षमतेचे महाविद्यालयसाताऱ्यात १०० विद्यार्थी क्षमतेचे वैद्यकीय महाविद्यालय सुरु होत आहे. २०२१-२२ या शैक्षणिक वर्षापासून प्रवेश सुरु होतील. त्यासाठी विविध ५१० पदे भरली जाणार आहेत. महाविद्यालयाला मंजुरीसाठी एनएमसी (नॅशनल मेडिकल कौन्सिल) तर्फे लवकरच पाहणी होणार आहे. तोपर्यंत तात्काळ पदे भरणे शक्य नसल्याने मिरज, पुणे व सोलापुरातून डॉक्टरांना पाठविले आहे.एनएमसीच्या नियमानुसार एखादा डॉक्टर पाहणीवेळी महाविद्यालयात नियुक्ती दाखविल्यास पुढील वर्षभरापर्यंत त्याला अन्य महाविद्यालयात हजर होता येणार नाही. त्यामुळे मिरजेतून ३७ डॉक्टर्स साताऱ्याला हजर झाल्यास वर्षभरासाठी ते कागदोपत्री तेथेच राहतील. सातारा महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गायकवाड मंगळवारी मिरजेत आले, आदेशानुसार डॉक्टरांना त्वरीत कार्यमुक्त करण्यासाठी त्यांनी पाठपुरावा केला, त्यामुळे संध्याकाळी उशिरापर्यंत डॉक्टरांना कार्यमुक्त करण्यात आले. तथापि, सध्यातरी ते मिरज व सांगली रुग्णालयातच काम करणार आहेत.मुंबई, कोल्हापुरातूनही बदल्याअलीबाग येथील नव्या महाविद्यालयासाठी मुंबईतून तर सिंधुदुर्ग येथील महाविद्यालयासाठी कोल्हापुरातून डॉक्टर घेतले आहेत. अलीबागसाठी मुंबईतून ४१, पुण्यातून २ व नागपुरातून एक असे ४४ डॉक्टर घेतले आहेत. सिंधुदुर्गसाठी कोल्हापुरातून ३३, मिरजेतून सहा, लातुरातून एक व नांदेडमधून दोन असे ४४ डॉक्टर्स घेतले आहेत.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलSangliसांगलीSatara areaसातारा परिसरkolhapurकोल्हापूरsindhudurgसिंधुदुर्ग