ग्रामसेवकास धमकावल्याप्रकरणी पोलिसाची बदली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:27 IST2021-05-10T04:27:12+5:302021-05-10T04:27:12+5:30
सांगली : माधवनगर(ता.मिरज) येथे लॉकडाऊन कालावधीत एका व्यावसायिकावर कारवाई का केली, याचा जाब विचारत पोलिसाने ग्रामसेवकाला धमकावल्याचा प्रकार घडला. ...

ग्रामसेवकास धमकावल्याप्रकरणी पोलिसाची बदली
सांगली : माधवनगर(ता.मिरज) येथे लॉकडाऊन कालावधीत एका व्यावसायिकावर कारवाई का केली, याचा जाब विचारत पोलिसाने ग्रामसेवकाला धमकावल्याचा प्रकार घडला. पोलीस अधीक्षक दिक्षित गेडाम यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत सांगली ग्रामीणकडील पोलीस कर्मचारी महेश जाधव यांची तडकाफडकी मुख्यालयात बदली करण्यात आली आहे.
लॉकडाऊन कालावधीत व्यवसाय सुरू ठेवला म्हणून माधवनगरचे ग्रामसेवक उमेश नवाळे यांनी एकावर कारवाई केली होती. हा व्यावसायिक पोलीस कर्मचारी जाधव यांचा संबंधित असल्याने त्यांनी नवाळे यांना कारवाईबद्दल जाब विचारला. त्यानंतर नवाळे यांनी याबाबत मिरज तहसीलदारांकडे तक्रार केली होती. त्यानुसार या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सांगली ग्रामीणचे पाेलीस निरीक्षक चंद्रकांत बेदरे यांना पत्र आले होते. अखेर या चौकशीनंतर पोलीस अधीक्षक दिक्षित गेडाम यांनी जाधव यांची मुख्यालयात बदली केली आहे.