सांगलीत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ४२ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

By संतोष भिसे | Published: January 13, 2024 05:00 PM2024-01-13T17:00:17+5:302024-01-13T17:00:42+5:30

सांगली : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ४२ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी शुक्रवारी जारी केले. ...

Transfer of 42 police officers in the background of Lok Sabha elections in Sangli | सांगलीत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ४२ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

सांगलीत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ४२ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

सांगली : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ४२ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी शुक्रवारी जारी केले. जिल्ह्यात तीन ते चार वर्षे झालेले, सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असणारे आणि मूळ सांगली जिल्ह्यातील असणारे अधिकारी बदली प्रक्रियेत आहेत.

अधिकाऱ्याचे नाव, सध्याचे ठिकाण व बदलीचे ठिकाण असे : निरिक्षक - अभिजित देशमुख, सांगली शहर (पोलिस कल्याण),  संतोष डोके, विटा (विशेष शाखा, सांगली), अरुण सुगावकर, गुप्तवार्ता (मिरज शहर). सहायक निरिक्षक - बजरंग झेंडे, तासगाव (वाहतूक शाखा, विटा), मनमीत राऊत ( वाहतूक शाखा, इस्लामपूर), नितीन राऊत, तासगाव (मिरज उपाधीक्षक), अण्णासाहेब बाबर, आष्टा (आर्थिक गुन्हे शाखा), पल्लवी यादव, विश्रामबाग (गुप्तवार्ता), गजानन कांबळे, विशेष शाखा (सांगली ग्रामिण), जयश्री वाघमोडे, वाहतूक शाखा, विटा (विटा), विनोद कांबळे, कवठेमहांकाळ (आटपाडी), समीर ढोरे, सांगली शहर (तासगाव), प्रियांका बाबर, मानवी तस्करी प्रतिबंधक विभाग (सांगली ग्रामिण), दत्तात्रय कोळेकर, आटपाडी (कवठेमहांकाळ), अनिल जाधव, विटा (चिंचणी वांगी), जयदीप कळेकर, वाहतूक शाखा, इस्लामपूर (आष्टा), भालचंद्र देशमुख, मिरज उपाधीक्षक कार्यालय (कासेगाव), जयसिंग पाटील, शिराळा (कुरळप), गणेश वाघमोडे, कुरळप (दहशतवादविरोधी शाखा), प्रफुल्ल कदम, सांगली ग्रामिण (जिल्हा विशेष शाखा), प्रदीप शिंदे, दहशतवादविरोधी शाखा (आष्टा), सागर गोडे, कवठेमहांकाळ (सांगली शहर). उपनिरिक्षक - जगन्नाथ पवार, कवठेमहांकाळ (जत उपाधीक्षक कार्यालय), सुुरेखा सूर्यवंशी, कवठेमहांकाळ (स्थानिक गुन्हा अन्वेषण), आप्पासाहेब पडळकर, आटपाडी (सांगली न्यायालय), स्मिता पाटील, सांगली ग्रामिण (मानवी तस्करी प्रतिबंधक विभाग), दिलीप पवार, कडेगाव (नियंत्रण कक्ष), विजय पाटील, कुरळप (नियंत्रण कक्ष), विद्यासागर पाटील, मिरज शहर (नियंत्रण कक्ष), दीपक सदामते, संजयनगर (नियंत्रण कक्ष), राजू अन्नछत्रे, महात्मा गांधी, मिरज (तासगाव), दीपक माने, सांगली शहर (मिरज ग्रामिण), श्रीकांत वासुदेव, मिरज शहर (इस्लामपूर), प्रमोद खाडे, महात्मा गांधी, मिरज (सांगली शहर), संदीप गुरव, तासगाव (महात्मा गांधी, मिरज), सागर गायकवाड, विटा (इस्लामपूर), रुपाली गायकवाड, सांगली शहर (महात्मा गांधी, मिरज), केशव रणदीवे, मिरज ग्रामिण (सांगली शहर), जयश्री कांबळे, इस्लामपूर (विटा), अफरोज पठाण, विश्रामबाग (जिल्हा विशेष शाखा), मनीषा नारायणकर, जत (आर्थिक गुन्हे शाखा). कासेगावचे सहायक निरिक्षक दीपक जाधव आणि चिंचणी वांगीचे सहायक निरिक्षक संदीप साळुंखे यांनाही नियंत्रण कक्षाकडे नियुक्त केले आहे.

Web Title: Transfer of 42 police officers in the background of Lok Sabha elections in Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.