lockdown -सांगलीतील व्यापारी उतरले रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 13:06 IST2021-07-14T13:03:11+5:302021-07-14T13:06:03+5:30
Sangli lockdown: सांगली शहरातील सर्वच दुकाने उघडण्यास परवागनी द्यावी, या मागणीसाठी बुधवारी व्यापारी रस्त्यावर उतरले. हातात फलक घेऊन मानवी साखळी करीत लॉकडाऊनच्या निर्णयाचा निषेधही केला.

lockdown -सांगलीतील व्यापारी उतरले रस्त्यावर
सांगली : शहरातील सर्वच दुकाने उघडण्यास परवागनी द्यावी, या मागणीसाठी बुधवारी व्यापारी रस्त्यावर उतरले. हातात फलक घेऊन मानवी साखळी करीत लॉकडाऊनच्या निर्णयाचा निषेधही केला.
व्यापारी एकता असोसिएशनच्या नेतृत्वाखाली या आंदोलनात हॉटेल, किराणा, भाजी विक्रेता, कापड, सराफी व्यापार संघटनासह सर्वपक्षीय कृती समितीनेही सहभाग घेतला. शहरातील हरभट रोडवर व्यापाऱ्यांनी मानवी साखळी केली.
गेली दोन वर्षे शहरातील व्यापाऱ्यांना विविध संकटांना तोंड द्यावे लागले आहे. त्यात सातत्याने निर्बंध लादले जात असल्याने व्यापारी उद्धवस्त झाला आहे. शासनाकडूनही त्याला कसलीही मदत देण्यात आलेली नाही. कर्जाचे हप्ते, व्याज, कामगारांचे पगार, घरखर्च भागविण्यासाठी व्यापाऱ्यांनी भीक मांगो आंदोलन हाती घेतल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष समीर शहा यांनी सांगितले.