सरकारच्या धोरणाविरोधात व्यापाऱ्यांचा उद्या बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:19 IST2021-07-15T04:19:52+5:302021-07-15T04:19:52+5:30
सांगली : केंद्र शासनाचे डाळी, कडधान्य व्यापारावरील निर्बंध आणि राज्य शासनाचे कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्यातील बदलाचे धोरण याविरोधीत ...

सरकारच्या धोरणाविरोधात व्यापाऱ्यांचा उद्या बंद
सांगली : केंद्र शासनाचे डाळी, कडधान्य व्यापारावरील निर्बंध आणि राज्य शासनाचे कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्यातील बदलाचे धोरण याविरोधीत शुक्रवारी (दि. १६) मार्केट यार्डातील व्यापार बंद ठेवणार आहे, अशी माहिती चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष शरद शहा यांनी बुधवारी दिली.
ते म्हणाले, केंद्र शासनाने डाळी, कडधान्य यावरील साठा मर्यादा आदेश काढले आहेत. डाळी व्यापार करणाऱ्या घाऊक, किरकोळ व्यापाऱ्यांना स्टॉक पोर्टलवर माहिती देऊन व्यापार करणे अनिवार्य केले आहे. डाळी, कडधान्य साठा मर्यादा आदेशास व्यापारी, कारखानदारांचा विरोध आहे. कारण डाळींचा पुरवठा कमी होऊन भाववाढ होईल. शेतकऱ्यांनाही ते अडचणीचे ठरणार आहे. याचा विचार करून साठा मर्यादा निर्बंध उठवावेत. राज्य शासनाने बाजार समिती कायद्यात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार हमीभाव व पट्टी वेळेत न दिल्यास शिक्षेची तरतूद केली आहे. हा निर्णय चुकीचा आहे. बाजार समितीचा सेस आणि प्रवेश शुल्क रद्द करून शासनाने बाजार समित्यांना अनुदान द्यावे. व्यापाऱ्यांच्या दुकानाची दुरुस्ती करताना बाजार समितीची परवानगी घेण्याची सक्ती केली आहे, याविरोधात दि. १६ जुलै रोजी बंद पाळण्यात येणार आहे.