शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: बांधकामासाठीच्या खड्ड्यात बुडून चिमुकल्याचा मृत्यू, आणखी एक मुलगा गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 15:48 IST

खेळत असताना घडली घटना  

जत : जाडरबोबलाद (ता. जत) येथे बांधकामासाठी खणण्यात आलेल्या पाण्याच्या डबक्यात बुडून चौदा महिन्याच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला, तर एकाचा जीव वाचला. श्रवण महेश चनगोंड (वय १ वर्ष ४ महिने) असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. ही घटना सोमवारी दुपारी बारा वाजता घडली, तर करण महेश चनगोंड (२ वर्षे ५ महिने रा. जाडरबोबलाद, ता. जत) याची प्रकृती गंभीर आहे. त्यास पुढील उपचारासाठी मिरजेला हलविले आहे.महेश चनगोंड यांच्या शेतात घराचे बांधकाम सुरू आहे. बांधकामाच्या कामासाठी घराच्या शेजारीच सहा फुटाचे डबके खणण्यात आलेले आहे. त्यामध्ये पाणी साठवलेले आहे. सोमवारी सकाळी ११ वाजता चौदा महिन्याचा श्रवण व अडीच वर्षाचा करण अंगणात खेळत होते. आई घरच्या कामात व्यस्त होती. वडील महेश हे सांगली येथे फायनान्स कंपनीमध्ये काम करतात, तर आजोबा गावात गेले होते. आजी शेतात कामासाठी गेल्या होत्या. दोन्ही मुलं घराशेजारी खेळत खेळत पाण्याने भरलेल्या डबक्यात पडली. या घटनेनंतर दोघांनाही तत्काळ पाण्याबाहेर काढून जत शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, श्रवण यांच्या पोटात भरपूर पाणी गेल्याने त्याचा मृत्यू झाला, तर करण याची प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी त्याच्यावर प्राथमिक उपचार करून मिरज येथे उपचारासाठी घेऊन जाण्यासाठी पुढे पाठवून दिले. जत ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदन करून श्रवण याचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला. या घटनेची उमदी पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.