शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: छेडछाडीला कंटाळून महाविद्यालयीन तरुणीने संपवले जीवन, गुन्हा दाखल होताच तरुण फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2024 17:57 IST

मिरज : खंडेराजुरी (ता. मिरज ) येथे तरुणाच्या छेडछाडीला कंटाळून स्वाती रामचंद्र जाधव (वय १९) या महाविद्यालयीन तरुणीने आत्महत्या ...

मिरज : खंडेराजुरी (ता. मिरज) येथे तरुणाच्या छेडछाडीला कंटाळून स्वाती रामचंद्र जाधव (वय १९) या महाविद्यालयीन तरुणीने आत्महत्या केली. तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी साहिल बबन डफेदार (वय २२, रा. खंडेराजुरी) या तरुणाविरुद्ध ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर साहिल डफेदार फरार झाला आहे.स्वाती जाधव ही मिरजेतील एका महाविद्यालयात बारावीत शिकत होती. ती गावातून मिरजेला महाविद्यालयात जाताना व येताना खंडेराजुरी येथे टेम्पोचालक म्हणून काम करणारा साहिल डफेदार गेल्या चार महिन्यांपासून तिची छेडछाड करीत होता. स्वातीने याबाबत पालकांना सांगितल्यानंतर त्यांनी साहिल याच्या घरी जाऊन त्याच्या आई-वडिलांना साहिलविरुद्ध पोलिसात तक्रार देणार असल्याचे सांगितले. यावेळी साहिलच्या आई-वडिलांनी त्यास समजावण्याची तसेच मुलीला यापुढे कसलाही त्रास हाेणार नाही अशी ग्वाही दिल्याने जाधव कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार दिली नाही. मात्र, काही दिवसांनंतर साहिल याने पुन्हा त्रास देण्यास सुरुवात केल्याने त्याच्या त्रासाला कंटाळून स्वाती हिने दि. १७ ऑगस्ट रोजी घरात कीटकनाशक प्राशन केले. हा प्रकार लक्षात येताच कुटुंबीयांनी तिला उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान २२ रोजी तिचा मृत्यू झाला. याबाबत रामचंद्र जाधव यांनी पोलिसांत फिर्याद दिली असून, स्वाती जाधव हिला मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी साहिल डफेदार याच्याविरुद्ध ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Sangliसांगलीmiraj-acमिरजCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस