शहरं
Join us  
Trending Stories
1
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
2
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
3
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
4
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
5
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
6
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
7
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
8
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
9
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
10
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
11
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
12
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
13
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
14
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
15
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
16
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
17
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
18
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
19
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
20
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
Daily Top 2Weekly Top 5

शेतीचे ११५ कोटींचे वीज बिल थकित

By admin | Updated: November 14, 2014 23:24 IST

महावितरणला फटका : ‘कृषी संजीवनी’कडे दुर्लक्ष

सांगली : जिल्ह्यातील एक लाख ४६ हजार ७५४ कृषी पंपांच्या ग्राहकांकडे महावितरण कंपनीची ५ नोव्हेंबर २०१४ पर्यंतची ११५ कोटी रूपयांची वीज बिलाची थकबाकी आहे. ही थकबाकी वसुलीसाठी महावितरण कंपनीने कृषी संजीवनी योजना आणूनही ग्राहकांनी त्याला काहीच प्रतिसाद न दिल्यामुळे थकबाकी काहीच वसूल झाली नाही. यामुळे महावितरण कंपनीकडील थकबाकीचा डोंगर वाढतच चालला आहे.कृषी पंपांच्या थकबाकी वसुलीसाठी राज्य शासनाच्या सहकार्याने महावितरण कंपनीने आॅगस्ट २०१४ मध्ये कृषी संजीवनी योजना सुरु केली. या योजनेत सहभागी होणाऱ्या कृषिपंपधारक शेतकऱ्यांच्या थकित वीज बिलापैकी ५० टक्के शासन भरणार होते. उर्वरित ५० टक्के शेतकऱ्याने भरायची होती. या थकबाकीवरील व्याज आणि दंडाची रक्कम महावितरण कंपनी माफ करणार होती. या योजनेची पहिल्या टप्प्याची मुदतही संपली. परंतु, शेतकऱ्यांनी काहीच थकबाकी भरली नसल्यामुळे महावितरण कंपनीने पुन्हा एका महिन्याची मुदतवाढ देऊन ३० आॅक्टोबर २०१४ केली. या कालावधितही शेतकऱ्यांनी थकित वीज बिल न भरल्यामुळे महावितरण कंपनी आर्थिक अडचणीत सापडली आहे.कृषी पंपांच्या वीज बिल थकितामध्ये कवठेमहांकाळ विभाग आघाडीवर आहे. या विभागामधील ५३ कोटी १७९ ग्राहकांचे चक्क ५३ कोटी ४६ लाख रूपये थकित वीज बिल आहे. थकबाकीत जत, कवठेमहांकाळ तालुके आघाडीवर असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. कवठेमहांकाळ विभागानंतर थकबाकीत दुसऱ्या क्रमांकावर सांगली ग्रामीण विभाग आहे. सांगली ग्रामीण विभागामध्ये मिरज, तासगाव तालुक्यांचा समावेश होतो. येथील ३३ हजार ११३ ग्राहकांकडे २६ कोटी ३१ लाख रूपये वीज बिलांची थकबाकी आहे. विटा विभागामधील ३७ हजार ३७४ ग्राहकांकडे २५ कोटी १५ लाख रूपयांची थकबाकी आहे. सांगली शहर विभागात कृषी पंपाचे केवळ ९३६ ग्राहक असल्यामुळे त्यांच्याकडील थकबाकीही कमी दिसत आहे. इस्लामपूर विभागातील सात हजार २१५ ग्राहकांकडे नऊ कोटी ५६ लाख ४१ हजार रूपयांची थकबाकी आहे. या ग्राहकांकडील थकबाकीमुळे महावितरण कंपनी आर्थिक अडचणीत सापडली आहे. राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणामुळेच ही शेती पंपाची थकबाकी असल्याचा शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आरोप केला आहे. (प्रतिनिधी)कृषी पंपांची विभागनिहाय थकबाकीविभागग्राहक संख्याथकबाकीइस्लामपूर७२१५९.५६ कोटीकवठेमहांकाळ५३१७९५३.४६ कोटीसांगली ग्रामीण३३११३२६.३१ कोटीसांगली शहर९३६५० लाखविटा३७३७४२५.१५ कोटीएकूण १४६७५४११४.९९ कोटी