अंधार पडताच ती बागेत शिरतात ; त्यांचा पहाटेपर्यंत धिंगाणा सुरू - द्राक्षबागांत वटवाघळांचे थैमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2019 08:49 PM2019-12-23T20:49:08+5:302019-12-23T20:52:07+5:30

अंधार पडताच ती बागेत शिरतात. त्यांचा पहाटेपर्यंत धिंगाणा सुरू असतो. खाणे कमी आणि नासधूसच जास्त चालते. फुटलेल्या द्राक्षांचा सडा पडतो. दोन-चार द्राक्षे जरी खाल्ली तरी संपूर्ण घड खराब होऊन तो विक्रीयोग्य राहत नाही.

Thymens in the vineyard | अंधार पडताच ती बागेत शिरतात ; त्यांचा पहाटेपर्यंत धिंगाणा सुरू - द्राक्षबागांत वटवाघळांचे थैमान

बेडगमध्ये वटवाघळांच्या खाण्याने द्राक्षघडांचे असे नुकसान होत आहे. वटवाघळांच्या हल्ल्यापासून बचावासाठी शेतकऱ्यांनी द्राक्षे लवकर काढून बेदाणा करणे पसंत केले आहे. बेडगमध्ये डिसेंबर महिन्यातच असे बेदाणा शेड भरू लागले आहेत.

Next
ठळक मुद्देद्राक्षांवर ताव, , अतिवृष्टीतून बचावलेल्या बागांसमोर नवेच संकट, शेतकऱ्यांची बेदाणा शेडकडे धाव

सांगली : अतिवृष्टीतून बचावलेल्या द्राक्षबागांसमोर आता नवेच संकट उभे ठाकले आहे. पक्व झालेल्या द्राक्षांवर वटवाघळांचे हल्ले सुरू झाले आहेत. संध्याकाळी बहरलेली द्राक्षबाग दुसºयादिवशी सकाळी उद्ध्वस्त झाल्याचे अनुभव येत आहेत. या संकटाने द्राक्षशेतकरी धास्तावला आहे. द्राक्षांच्या विक्रीपर्यंत थांबण्याऐवजी ती बेदाण्यासाठी काढून नेली जात आहेत. त्यामुळे यंदा सुमारे दीड महिना आधीच बेदाण्याचा हंगाम सुरू झाला आहे.
शेतकºयांनी अतिवृष्टीतून द्राक्षबागा जिद्दीने बाहेर काढल्या. लाखो रुपये खर्चून द्राक्षे वाचवली. त्यावर आता वटवाघळांचे थैमान सुरू झाले आहे. शेतकºयांसाठी हे संकट अनपेक्षित ठरले आहे. एकावेळी दीड-दोनशेच्या संख्येने येणारी वटवाघळे रात्रभरात एकरातील संपूर्ण बाग उद्ध्वस्त करतात, असे बेडगमधील शेतकरी अनिल खाडे यांनी सांगितले. द्राक्षात साखर उतरली की वटवाघळांना त्याची चाहूल लागते. अंधार पडताच ती बागेत शिरतात. त्यांचा पहाटेपर्यंत धिंगाणा सुरू असतो. खाणे कमी आणि नासधूसच जास्त चालते. फुटलेल्या द्राक्षांचा सडा पडतो. दोन-चार द्राक्षे जरी खाल्ली तरी संपूर्ण घड खराब होऊन तो विक्रीयोग्य राहत नाही.
वटवाघळांची चाहूल लागलेल्या काही शेतकºयांनी द्राक्षांची लवकर उतरण करून बेदाणा करणे पसंत केले आहे. पावणेचार महिन्यांची द्राक्षे बेदाण्यासाठी शेडवर दिसू लागली आहेत. एरवी जानेवारीनंतर बेदाण्याचा हंगाम सुरू होतो; पण यंदा हिवाळ््यातच बेदाणा शेड भरू लागली आहेत. पंधरा ते वीस दिवसांत बेदाणा तयार होण्याची अपेक्षा आहे. वातावरणात ऊब नसल्याने औषधांचा वापर जास्त करावा लागणार आहे.
-------
जाळी आणि प्रखर दिवे
वटवाघळांसह अन्य पक्ष्यांच्या हल्ल्याला तोंड देण्यासाठी शेतकरी बागेवर जाळी लावताहेत, शिवाय रात्रभर प्रखर प्रकाशझोतही सोडावा लागत आहे. निशाचर असणारी वटवाघळे प्रखर प्रकाशामुळे बागेकडे फिरकत नाहीत, द्राक्षांचा बचाव होतो.
----------

 

Web Title: Thymens in the vineyard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी