शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपुरातील गांडूळ खत प्रकल्पाचे तीनतेरा

By admin | Updated: August 11, 2015 00:31 IST

नवीन योजनांची तयारी : घनकचरा नियोजनाच्या अभ्यासासाठी पालिकेचे नेते मुंबई दौऱ्यावर

अशोक पाटील- इस्लामपूर शहरात घनकचऱ्यापासून गांडूळ खत तयार करण्याचा प्रकल्प उभारण्यात आला होता. त्याचे तीनतेरा वाजले आहेत. आता नगरपालिका बायोगॅस, घनकचरा नियोजनासाठी काही नवीन योजना आखण्याच्या तयारीत आहे. अशा प्रकल्पांच्या अभ्यासासाठी पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील, नगराध्यक्ष सुभाष सूर्यवंशी, उपनगराध्यक्ष संजय कोरे, डांगे गटाचे अ‍ॅड. चिमण डांगे आणि एन. ए. गु्रपचे खंडेराव जाधव यांनी मुंबई गाठल्याचे समजते.शहरात स्वच्छतेसाठी राबविण्यात येणाऱ्या अनेक योजनांचा बोजवारा उडाला आहे. भुयारी गटार योजना आणि २४ बाय ७ पाणी पुरवठा योजना फक्त कागदावरच आहे. २४ बाय ७ साठी प्राप्त झालेल्या अनुदानाची वाट फक्त सर्व्हे एजन्सीवर लावली आहे. या दोन्ही योजना रद्द झाल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. कचरा डेपो आणि कुंड्या कचऱ्याने भरुन वाहत आहेत. कचऱ्यापासून गांडूळ खत तयार करण्यासाठी पालिकेने कोट्यवधीचा खर्च करुन प्रकल्प उभारला, परंतु तो सध्या बंद आहे. डेपोवर नेमलेले सुरक्षा रक्षक नेहमीच गैरहजर असतात. परंतु त्यांचा पगार मात्र काढण्यात येतो.शहरातील गांडूळ खत प्रकल्पाचे तीनतेरा वाजल्याने आमदार जयंत पाटील यांनी मुंबईत भाभा अनुसंधान केंद्रातील काही प्रकल्प पाहण्यासाठी पालिकेतील ठराविक पदाधिकाऱ्यांना आमंत्रित केले होते. यामुळेच पालिकेचे हे पदाधिकारी सोमवारी पहाटे मुंबईला मार्गस्थ झाले.इस्लामपूर पालिकेवर राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. नगराध्यक्ष सुभाष सूर्यवंशी हे सहीपुरतेच पालिकेचे धनी आहेत. शहरातील विविध विकास कामांवर कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. परंतु अंतर्गत संघर्षामुळे एकही विकासकाम शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचलेले नाही. जी विकासकामे झाली आहेत, त्यांचा दर्जा चांगला नाही. त्यामुळे केलेल्या विकास कामांचे तीनतेरा वाजले आहेत. हीच परिस्थिती गांडूळ खत प्रकल्पाची झाली आहे. आता नव्याने सत्ताधारी यामध्ये काय नवीन करणार, याकडेच साऱ्या शहरातील सामान्यांचे लक्ष लागून राहिले आहे.डॉ. शरद काळे यांनी मुंबई येथील ‘निसर्ग ऋण प्रकल्प’ पाहणी करण्यासाठी पालिकेच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रित केले होते. परंतु इस्लामपूर शहरातील घनकचरा प्रकल्प बंद पाडलेले पदाधिकारीच आज मुंबई येथे नवीन प्रकल्प पाहण्यासाठी गेले आहेत. खरोखरच इस्लामपूर शहराचे घनकचरा व्यवस्थापन ‘निसर्ग ऋणा’तून मुक्त व्हायचे असेल, तर सत्ताधाऱ्यांनी प्रामाणिक प्रयत्न करणे गरजेचे आहे.- विजय कुंभार, विरोधी पक्षनेते, इ. न. पा.जयंत पाटलांचा आदेश आणि ...पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील हे पालिकेचा कारभार हाकत आहेत. परंतु विजय पाटील यांच्याविरोधात डांगे गट आणि एन. ए. गु्रप असे दोन गट कार्यरत आहेत. पालिकेच्या माध्यमातून शहरातील विकासकामे करताना विजय पाटील आणि अ‍ॅड. चिमण डांगे एकत्र येऊनच सर्व निर्णय घेतात. तसेच एन. ए. गु्रपचे खंडेराव जाधव अंतर्गत विरोधात असले तरी, जयंत पाटील यांच्यासमोर मात्र सर्व काही आलबेल असल्याचे दाखवितात. याच गु्रपचे संजय कोरे यांना उपनगराध्यक्षपद मिळाले आहे. परंतु त्यांनी त्यांच्या आसनाचा त्याग केला आहे. त्यामुळे पालिकेच्या राजकारणात राष्ट्रवादीचे तीन गट कार्यरत असल्याचे नेहमीच स्पष्ट झाले आहे. तरी सुध्दा जयंत पाटील यांच्या आदेशाने सोमवारी पहाटे हे सर्व एकत्रितपणे एकाच गाडीतून मुंबईला गेले आहेत. त्यामुळे हा चर्चेचा विषय बनला आहे.