नगराध्यक्ष पदासाठी तीन अर्ज
By Admin | Updated: October 27, 2016 23:24 IST2016-10-27T23:10:24+5:302016-10-27T23:24:33+5:30
आष्टा नगरपालिकेसाठी २९ उमेदवार : सत्ताधारी, विरोधी गटाकडे लक्ष

नगराध्यक्ष पदासाठी तीन अर्ज
आष्टा : आष्टा नगरपरिषद निवडणुकीत गुरुवारी नगराध्यक्ष पदासाठी तीन, तर नगरसेवक पदासाठी २९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. माजी नगराध्यक्ष झुंझारराव पाटील, झुंझारराव शिंदे, विशाल शिंदे, विजय मोरे, प्रभाकर जाधव, रंजना शेळके यांच्यासह वीर कुदळे, अमोल पडळकर, ज्ञानदेव पवार यांनी अर्ज दाखल केले. नगराध्यक्ष पदासाठी लता पडळकर, स्नेहा माळी, जयश्री कुदळे यांनी अर्ज दाखल केले आहेत. दोन्ही गट एकास एक लढत देण्यासाठी मोर्चेबांधणी करीत आहेत.
आष्टा नगराध्यक्ष पदासाठी सत्ताधारी आष्टा शहर विकास आघाडीच्यावतीने स्नेहा संभाजी माळी यांचा, तर विरोधी लोकशाही आघाडीच्यावतीने लता अमोल पडळकर व जयश्री वीरशैव कुदळे यांनी अर्ज दाखल के ले.
नगरसेवक पदासाठी प्रभाग क्रमांक १ ‘अ’मधून सारिका अंकुश मदने, स्मिता मयूर धनवडे, तर ‘ब’ मधून विशाल विलासराव शिंदे यांनी अर्ज भरला. प्रभाग क्र. २ ‘ब’मधून वसंत पांडुरंग बसुगडे यांनी, प्रभाग क्र. ३ ‘ब’मधून विजय रामचंद्र हाबळे, विजय रंगराव मोरे, अर्जुन शामराव सावंत, प्रभाग क्र ४ ‘अ’मधून नारायण तुकाराम वायदंडे, दिलीप गुंडा कुरणे यांनी, तर ‘ब’ मधून वर्षा संतोष अवघडे, प्रभाग क्र ५ ‘ब’मधून झुंझारराव शिवाजीराव पाटील, अण्णासाहेब हालुंडे, प्रभाग क्र. ६ ‘अ’मधून वीरशैव कुदळे, तर ‘ब’मधून विमल राजकुमार थोटे यांनी अर्ज भरले. प्रभाग क्र. ७ ‘अ’मधून शेरनवाब शमशुद्दीन देवळे, अमोल पडळकर, नूरमोहम्मद उस्मानबी मुजावर, ‘ब’मधून वैष्णवी सतीश कुलकर्णी, प्रभाग क्र. ८ ‘ब’मधून झुंझारराव भाऊसाहेब शिंदे, धैर्यशील झुंझारराव शिंदे, प्रभाग क्र. ९ ‘अ’मधून रंजना बाळासाहेब शेळके, मंगल बाळू ढोले, ‘ब’मधून विजय मोरे, प्रभाकर रंगराव जाधव, ज्ञानदेव रामचंद्र पवार, प्रभाग क्र. १० ‘अ’मधून पोपट ईश्वरा शेळके, ‘ब’मधून शारदा शिवाजी खोत, ‘क’मधून प्रमिला प्रकाश मिरजकर यांनी अर्ज दाखल केले. (वार्ताहर)
अंतिम उमेदवार कोण?: नागरिकांत चर्चा
सत्ताधारी व विरोधी गटातील इतर दिग्गज उमेदवार शुक्रवारी अर्ज दाखल करणार आहेत. अर्ज भरताना विविध अडचणींना तोंड देत उमेदवार अर्ज भरत आहेत. दोन्हीही गट अंतिम उमेदवारी कोणाला देणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. विरोधी गटाच्या उमेदवारावरच प्रतिस्पर्धी गटाकडून उमेदवारी देण्यात येणार आहे. यामुळे एका जागेसाठी सर्वच पक्षांनी दोन ते तीन उमेदवारांचा पर्याय ठेवला आहे.