शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

शिराळा तालुक्यात तीन पूल पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 15:28 IST

शिराळा तालुक्यात पावसाचा जोर वाढला असून गेल्या चोवीस तासात चांदोली धरण, चरण, कोकरूड या तीन मंडल विभागात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. मांगले-काखे,कोकरुड-रेठरे, येळापूर-समतानगर पूल वारणा नदीच्या पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. चांदोली धरण परिसरात १५५ मिलिमीटर, कोकरूडला ११६, तर चरण येथे ७१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. चांदोली धरणाची पाणीपातळी २४ तासात दीड मीटरने वाढली आहे.

ठळक मुद्देशिराळा तालुक्यात तीन पूल पाण्याखालीचोवीस तासात चांदोली धरण, चरण, कोकरूड विभागात अतिवृष्टी

शिराळा : शिराळा तालुक्यात पावसाचा जोर वाढला असून गेल्या चोवीस तासात चांदोली धरण, चरण, कोकरूड या तीन मंडल विभागात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. मांगले-काखे,कोकरुड-रेठरे, येळापूर-समतानगर पूल वारणा नदीच्या पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. चांदोली धरण परिसरात १५५ मिलिमीटर, कोकरूडला ११६, तर चरण येथे ७१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. चांदोली धरणाची पाणीपातळी २४ तासात दीड मीटरने वाढली आहे.मांगले-काखे पूल सोमवारी सकाळी सात वाजता पाण्याखाली गेला असून पुलावर दोन फूट पाणी आहे. त्यामुळे पुलावरील वाहतूक ठप्प झाली आहे. कोकरुड-रेठरे, येळापूर-समतानगर हे पूलही पाण्याखाली गेले आहेत. चांदोली धरण व अभयारण्य परिसरात मुसळधार पाऊस सुरु असल्याने चांदोली धरणात पाणीसाठा वेगाने वाढत आहे. धरणात ११.७७ टीएमसी पाणीसाठा आहे. धरण ३४.२० टक्के भरले आहे. उपयुक्त पाणीसाठा १.१० टीएमसीवरून ४.८७ टीएमसी झाला आहे. गतवर्षी ८ जुलैअखेर तालुक्यात सरासरी २४३.८० मि.मी. पावसाची नोंद झाली होती. मात्र यावर्षी १०१.१० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. मोरणा धरण, शिवणी, करमजाई, अंत्री, रेठरे धरणातील पाणीसाठा वाढत आहे.तालुक्यात ४९ पाझर तलावांतील पाणीसाठा वाढत आहे. खरीप हंगामातील धूळवाफेतील भात पेरणी केलेल्या पिकांची वाढ खुंटली होती, ती आता या पावसामुळे जोमाने होणार आहे. सतत चालू असलेल्या पावसामुळे भुईमूग सोयाबीन, ज्वारी पिकांची पेरणीची कामे खोळंबली आहेत. ९० टक्के भात पेरणी झाली आहे. रोपे लागणीची कामे सुरू झाली आहेत.

टॅग्स :DamधरणRainपाऊसSangliसांगली