शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Sangli Crime: पूर्वीच्या भांडणाचा राग; वाळव्यात भरवस्तीत तरुणाचा दगडाने ठेचून खून, आई-मुलांसह तिघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 12:39 IST

वाळवा : पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून महिलेसह तिघांनी वाळवा येथे एकाचा दगडाने ठेचून आणि काठीने मारहाण करून निर्घृण ...

वाळवा : पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून महिलेसह तिघांनी वाळवा येथे एकाचा दगडाने ठेचून आणि काठीने मारहाण करून निर्घृण खून केला. रविवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. संदेश ऊर्फ साहिल अशोक कदम (वय ३०, रा. वाळवा माळभाग) असे मृत तरुणाचे नाव आहे.याप्रकरणी अशोक भीमराव कदम यांनी आष्टा पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी प्रथमेश ऊर्फ बबलू आमसिद्ध कोळी, अभिजित ऊर्फ सोन्या टुमक्या परीट आणि राजश्री आमसिद्ध कोळी (सर्व रा. वाळवा, ता. वाळवा) यांना अटक केली आहे. वाळवा ते आहिरवाडी रस्त्याला, रॉयल हॉटेलजवळ देसाई प्लॉट येथे राजश्री आमसिद्ध कोळी हिच्या राहत्या घरात संदेश ऊर्फ साहिल अशोक कदम याला प्रथमेश कोळी आणि अभिजित परीट यांनी बोलावून घेतले.

तेथे पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणांवरून राजश्री कोळी हिच्यासह तिघांनी संदेश याला दारू पाजून डोक्यात काठीने व दगडाने मारहाण करत त्याचा निर्घृण खून केला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या संदेशला घराबाहेर थोड्या अंतरावर नेऊन टाकले.तिन्ही संशयित ताब्यातखुनाच्या घटनेची माहिती मिळताच आष्टा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. फाॅरेन्सिक पथक दाखल झाले. घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. दुपारपर्यंत पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेत अटक केली. याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक संदीप शितोळे तपास करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli: Old feud leads to brutal murder; three arrested.

Web Summary : In Walwa, Sangli, an old dispute resulted in the murder of a 30-year-old man. He was brutally killed with stones and sticks by three individuals, including a woman and her son, who are now arrested. Police are investigating.