शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: पंचवीस हजारांची लाच घेताना मंडल अधिकार्‍यासह तिघांना अटक, मृत्यूपत्राची नोंद करण्यासाठी मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2024 18:23 IST

सांगली : मृत्युपत्राची दप्तरी नोंद करून सातबारा देण्यासाठी २४ हजाराची लाच घेताना पेठ (ता. वाळवा) येथील मंडल अधिकारी मल्हारी ...

सांगली : मृत्युपत्राची दप्तरी नोंद करून सातबारा देण्यासाठी २४ हजाराची लाच घेताना पेठ (ता. वाळवा) येथील मंडल अधिकारी मल्हारी शंकर कारंडे (वय ४९), महादेववाडीच्या तलाठी सोनाली  कृष्णाजी पाटील, (वय ३५), कोतवाल हणमंत यशवंत गोसावी या तिघांना अटक केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.महादेववाडी परिसरातील तक्रारदार यांच्या आजोबानी तक्रारदार यांचे वडील व्यसनी असल्याने त्यांची मौजे महादेववाडी (ता.वाळवा) येथील वडिलोपार्जित जमीन त्यांच्या आईच्या नावाने केली होती. त्यासाठी २००४ मध्ये मृत्युपत्र करून ठेवले होते. २००९ मध्ये तक्रारदार यांचे आजोबा मृत झाले होते. तक्रारदार यांनी सुमारे आठ ते नऊ महिन्यापूर्वी तलाठी सोनाली पाटील यांच्याकडे  मृत्युपत्राची नोंद होण्यासाठी आईच्या नावाचा अर्ज दिला होता. मृत्युपत्राची दप्तरी नोंद करून तक्रारदार यांचे आईचे सातबारा सदरी नाव लावून देण्यासाठी तलाठी, मंडल अधिकारी व कोतवाल यांनी दि. २३ रोजी २५ हजाराची लाच मागितली. त्यामुळे तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. महादेववाडी तलाठी कार्यालय येथे केलेल्या पडताळणीत तिघांनी पंचासमक्ष सुरवातीला २५ हजार रूपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती २४ हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार पथकाने सापळा रचला. तेव्हा तलाठी सोनाली पाटील यांनी इस्लामपूर तहसील कार्यालयासमोरील हॉटेल आण्णा बुट्टे मध्ये तक्रारदार यांच्याकडून २४ हजार रुपये लाच स्वीकारली असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. तलाठी पाटील, मंडल अधिकारी कारंडे, कोतवाल गोसावी या तिघांना ताब्यात घेऊन इस्लामपूर पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल केला.उपअधीक्षक उमेश पाटील, पोलिस निरीक्षक किशोरकुमार खाडे, अंमलदार सीमा माने, प्रीतम चौगुले, अजित पाटील आदींच्या पथकाने कारवाई केली.

सलग दुसर्‍यांदा अशी कारवाईतासगाव तालुक्यात नुकतेच महसूल विभागीत महिलेसह तिघांवर लाचप्रकरणी कारवाई केली होती. त्यानंतर वाळवा तालुक्यात कारवाई केली.

टॅग्स :SangliसांगलीBribe Caseलाच प्रकरणAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागCrime Newsगुन्हेगारी