शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
2
१८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले 
3
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
4
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
5
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
6
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
7
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
8
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
9
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
10
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
11
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
12
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
13
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
14
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
15
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
16
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
17
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
18
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
19
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
20
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

तीन कारखाने ५ कोटी देणार, ताकारी योजना शुक्रवारी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2017 11:22 AM

ताकारी योजनेची वीजबिल थकबाकी भरण्यासाठी आमदार मोहनराव कदम दादा यांचा सोनहिरा, वांगी व उदगिरी, पारे बामणी तसेच माजी आमदार पृथ्वीराज देशमुख बाबा यांचा केन अ‍ॅग्रो, रायगाव व ग्रीन पॉवर, गोपूज तसेच अरुण लाड अण्णा यांचा क्रांती हे साखर  कारखाने प्रत्येकी १ कोटी रुपये अ‍ॅडव्हान्स देणार आहेत. 

कडेगाव- ताकारी योजनेची वीजबिल थकबाकी भरण्यासाठी आमदार मोहनराव कदम दादा यांचा सोनहिरा, वांगी व उदगिरी, पारे बामणी तसेच माजी आमदार पृथ्वीराज देशमुख बाबा यांचा केन अ‍ॅग्रो, रायगाव व ग्रीन पॉवर, गोपूज तसेच अरुण लाड अण्णा यांचा क्रांती हे साखर  कारखाने प्रत्येकी १ कोटी रुपये अ‍ॅडव्हान्स देणार आहेत. 

ताकारी योजनेची १० कोटी ५० लाख इतकी वीजबिल थकबाकी आहे. यापैकी  योजनेची ५ कोटी १८ लाख इतकी थकबाकी महावितरणकडे भरून योजना शुक्रवार, दि. २९ डिसेंबर रोजी सुरू केली जाणार आहे. तसेच टेंभू योजनेचीही   वीजबिल थकबाकी भरून आवर्तन सुरू करण्याबाबत लवकरच मार्ग काढला जाईल, असा निर्णय झाला.

कडेगाव येथे पत्रकारांच्या पुढाकाराने सोनहिरा साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार मोहनराव कदम, क्रांती कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड, केन अ‍ॅग्रो कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, आमदार अनिल बाबर तसेच ताकारी योजनेचे कार्यकारी अभियंता प्रकाश पाटील यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी ताकारी आणि टेंभू योजनांच्या वीजबिल थकबाकीबाबत तसेच आवर्तन सुरू करण्याबाबत यशस्वी चर्चा झाली.

ताकारी योजनेचा वीजपुरवठा महावितरणने खंडित केला आहे. यापैकी ५ कोटी १८ लाख इतकी थकबाकी भरल्यास वीजपुरवठा पूर्ववत जोडला जाणार आहे. सध्या योजनेकडे पाणीपट्टीचे कारखान्यांकडून जमा झालेले जवळपास १ कोटी २३ लाख रुपये जमा आहेत. आता सोनहिरा, उदगिरी, क्रांती, केन अ‍ॅग्रो आणि गोपूज कारखान्यांकडून प्रत्येकी १ कोटीप्रमाणे एकंदरीत ५ कोटी रुपये जमा होतील. ही रक्कम मंगळवार व बुधवार या दोन दिवसात देणार आहे, असे आमदार मोहनराव कदम, अरुण लाड व पृथ्वीराज देशमुख यांनी सांगितले.

गुरुवारी ५ कोटी १८ लाख वीज बिल थकबाकी महावितरणकडे भरली जाणार आहे. थकबाकी भरल्यावर वीजपुरवठा पूर्ववत होईल व ताकारी योजना २९ डिसेंबर रोजी सुरू करण्याचा निर्णय झाला.यावेळी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजाराम गरुड, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय विभुते, श्रमिक मुक्ती दलाचे मोहनराव यादव, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष सुभाष मोहिते आदींसह पत्रकार उपस्थित होते.

‘टेंभू’साठीही एकत्र येण्याची गरज : बाबरकडेगाव पलूस तालुक्यातील नेते आमदार मोहनराव कदम, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, अरुण लाड हे राजकारण बाजूला ठेवून एकत्र आले. या तिन्ही नेत्यांसह टेंभू योजनेच्या लाभक्षेत्रातील अन्य नेते व कारखानदार सर्व एकत्र आल्यास आवर्तनाचा मार्ग मोकळा होईल. शासनाकडून येणारी टंचाई  निधीची रक्कम आणि पाणीपट्टी वसुलीशिवाय गरज पडल्यास अ‍ॅडव्हान्स घेऊन टेंभू योजनेचे आवर्तनही तातडीने सुरू करता येईल, असे आमदार अनिल बाबर यांनी सांगितले.

बाहेरील कारखान्यांनी पाणीपट्टी वसूल करावीताकारी आणि टेंभू योजनांच्या लाभक्षेत्राबाहेरील काही कारखाने योजनांची पाणीपट्टी वसूल करून देत नाहीत. परंतु ऊस मात्र नेतात. अशा कारखान्यांना जिल्हाधिकारी यांनी नोटीस देऊन त्यांच्याकडून पाणीपट्टी वसूल करून घ्यावी. शेतकºयांनीही अशा कारखान्यांना ऊस देऊ नये. अशा कारखान्यांच्या ऊसतोडीस  शेतकºयांनी एकसंधपणे विरोध केला पाहिजे, अशी या बैठकीत चर्चा झाली.