सांगली : शहरातील मार्केट यार्डातील व्यापाऱ्यास मारहाण करत ६० हजार रुपये लुटणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी जहांगीर मौला लतीफ (वय ५१, रा. गव्हर्नमेंट कॉलनी, सांगली) यांनी विश्रामबाग पोलिसात फिर्याद दिली असून, अखिलेश महेश दरुरमठ (वय २६, रा. दामाणी हायस्कूलजवळ, सांगली), सुमित सुदाम माखिजा (२६, रा. शंभरफुटी रस्ता, मोती चौक, सांगली), ऋषिकेश प्रकाश आरगे (२४, रा. दत्तनगर, विश्रामबाग, सांगली), अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. डिसेंबर २०२० मध्ये हा गुन्हा घडला होता. लतीफ यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी संशयितांसह सुमित माखिजा अशा चौघांवर जबरी चोरीप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्यापैकी अखिलेश दरुरमठ, सुमित माखिजा आणि ऋषिकेश आरगे या तिघांना अटक करण्यात आली आहे.
व्यापारी लूटप्रकरणी तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:19 IST