शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

ऑफिस सुटते पाच वाजता, घरी पोहोचायला वाजतात रात्रीचे दहा; महाराष्ट्र एक्स्प्रेसच्या लहरी वेळापत्रकामुळे नोकरदारांची ससेहोलपट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2023 11:59 IST

लोकप्रतिनिधींनाही सोयरसुतक नाही

सांगली : कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेसची सुटण्याची वेळ बदलल्याने हजारो प्रवाशांची ससेहोलपट सुरू आहे. कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतील प्रवासी वेठीस धरले गेले आहेत. प्रवाशांच्या तक्रारीला परप्रांतीय अधिकारी दाद देत नसल्याचे चित्र आहे. पाच वाजता कामावरुन सुट्टी झालेल्या नोकरदारांना रात्री साडेआठ वाजता रेल्वे मिळत आहे. परिणामी घरी पोहोचायला चक्क दहा वाजत आहेत.कोरोनापूर्वी ही एक्स्प्रेस दुपारी ३.३० वाजता कोल्हापुरातून सुटायची. मिरजेत पावणेपाच व सांगलीत पाच वाजता यायची. त्यामुळे कोल्हापूर, सांगली, मिरजेतील हजारो नोकरदारांना घरी वेळेत पोहोचणे शक्य होते. कोरोनानंतर गाडीची वेळ बदलली असून, कोल्हापुरातून दुपारी पावणेतीन वाजता सोडली जात आहे. मिरजेत पावणेचार व सांगलीत चार वाजताच येऊ लागली आहे. त्यामुळे नोकरदारांना गाडी मिळेना झाली आहे. साताऱ्याच्या दिशेने जाण्यासाठी या गाडीनंतर रात्री उशिरापर्यंत दुसरी गाडी नाही. त्यामुळे प्रवासी हैराण आहेत.वेळ पूर्ववत करावी यासाठी सर्व स्तरांवर पाठपुरावा सुरु आहे. पण, पुणे विभागातील उत्तर प्रदेश, बिहारच्या अधिकाऱ्यांना मराठी प्रवाशांच्या त्रासाची पर्वा नाही. त्यांच्या मर्जीवर गाडी धावत आहे. त्यामुळे यामध्ये प्रवासी आणि रेल्वे या दोहोंचे नुकसान होत आहे.

लोकप्रतिनिधींनाही सोयरसुतक नाहीपुणे विभागीय सल्लागार समितीच्या बैठकीत ` वेळ बदलू ` असे सांगणारे अधिकारी नंतर मात्र पाठ फिरवतात. त्रस्त प्रवाशांनी खासदार संजय पाटील, धैर्यशील पाटील यांच्यासह सांगली, सातारा व कोल्हापुरातील सर्व आमदार, खासदारांना निवेदने दिली आहेत. पण, कोणीही पाठपुरावा केलेला नाही.

दुहेरीकरणानंतर पुन्हा वेळ बदलणारपुणे - मिरज लोहमार्गाचे दुहेरीकरण व विद्युतीकरण पूर्ण झाल्यावर एक्स्प्रेस गाड्यांची गती वाढणार आहे. त्यामुळे वेळेची बचत होणार आहे. परिणामी महाराष्ट्र एक्स्प्रेसची वेळ पुन्हा बदलली जाणार आहे. अर्थात, दुहेरीकरणानंतर गाड्या वाढणार असल्याने सायंकाळच्या प्रवाशांना एखादी गाडी मिळण्याची आशा आहे.

महाराष्ट्र एक्स्प्रेसच्या वेळेत बदलाची शक्यता कमी आहे. या गाडीला पुढे अन्य गाड्यांची कनेक्टिव्हिटी दिली आहे. त्यामुळे कोल्हापुरातून वेळ बदलण्याची अधिकाऱ्यांची मानसिकता नाही. दुहेरीकरणानंतर नवीन पॅसेंजर मागणे हाच तूर्त उपाय आहे. - सुकुमार पाटील, सदस्य, विभागीय रेल्वे सल्लागार समिती, मध्य रेल्वे.

टॅग्स :Sangliसांगलीkolhapurकोल्हापूरrailwayरेल्वे