क्रांतिमाता लक्ष्मीबाई यांचे विचार प्रेरक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:19 IST2021-06-28T04:19:00+5:302021-06-28T04:19:00+5:30
वाळवा : भारतीय स्वातंत्र्य लढ्यात कार्य केलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या योगदानाचा खरा इतिहास नवीन पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे, असे प्रतिपादन हुतात्मा ...

क्रांतिमाता लक्ष्मीबाई यांचे विचार प्रेरक
वाळवा : भारतीय स्वातंत्र्य लढ्यात कार्य केलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या योगदानाचा खरा इतिहास नवीन पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे, असे प्रतिपादन हुतात्मा साखर कारखाना अध्यक्ष वैभव नायकवडी यांनी केले.
हुतात्मा शिक्षण व उद्योग समूहाच्या वतीने आयोजित क्रांतिमाता लक्ष्मीबाई नायकवडी तथा आईसाहेब यांच्या स्मृतिदिन कार्यक्रमात ते बोलत होते.
हुतात्मा विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. एस. खणदाळे, जिजामाता विद्यालयाच्या मुख्याध्यापिका व्ही. के. चेंडके, किसान शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष आनंदराव शिंदे, विश्वास मुळीक, सर्जेराव फाटक, प्रा. हाशिम वलांडकर उपस्थित होते.
नायकवडी म्हणाले, हुतात्मा संकुलाच्या निर्मितीत क्रांतिमाता लक्ष्मीबाई नायकवडी तथा आईसाहेब यांचे योगदान होते. आपण नागनाथअण्णा व आईसाहेब यांचे वारसदार आहोत. त्यांचे विचार समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी आपण प्रयत्न करूया.
प्रा. राजा माळगी म्हणाले, आईसाहेब एक ऊर्जास्रोत होत्या. आजच्या काळात संस्कार देणारी ऊर्जेची विद्यापीठे नाहीशी होत आहेत. याची खंत त्यांनी व्यक्त केली.
प्रा. एस. आर. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. एम. जी. पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. श्रीधर कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. आर. एन. मुल्ला व एस. व्ही. पाटील यांनी संयोजन केले.