शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
4
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
5
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
6
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
7
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
8
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
9
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
10
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
11
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
12
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
13
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
14
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
15
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
16
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
17
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
18
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
19
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
20
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसमध्ये सत्ता भोगलेले आता स्वार्थासाठी पळून गेले, विश्वजीत कदम यांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 17:47 IST

राज्यातील सत्ता बदलाची सुरुवात सांगलीतून करूया : विशाल पाटील

सांगली: काँग्रेसने जिल्ह्यातील आणि महापालिका शहरातील नेत्यांच्या सर्व गरजा पूर्ण केल्या आणि महत्त्वाच्या पदांवर त्यांना नियुक्त केले. मात्र, काही मंडळी सत्ता भोगून स्वार्थासाठी पळून गेली आहेत. त्यांची चिंता करू नका. काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बळावर आणि मतदारांच्या विश्वासावर महापालिकेची निवडणूक लढविली आणि जिंकली जाईल, असा विश्वास आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी व्यक्त केला.सांगलीत मंगळवारी काँग्रेस कमिटीमध्ये पक्षाचे नवे शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक यांच्या पदग्रहण सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात डॉ. कदम बोलत होते. यावेळी खासदार विशाल पाटील, जिल्हाध्यक्ष व माजी आमदार विक्रमसिंह सावंत, युवा नेते जितेश कदम, माजी नगरसेवक मंगेश चव्हाण, काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष प्रा. सिकंदर जमादार, अय्याज नायकवडी यांसह इतर प्रमुख उपस्थित होते. डॉ. कदम यांच्या हस्ते राजेश नाईक यांना निवडीचे पत्र देण्यात आले आणि पदग्रहण सोहळा पार पडला.डॉ. विश्वजित कदम म्हणाले, मिरज आणि सांगलीतील अनेक प्रभावशाली काँग्रेस नेत्यांनी पक्षाला सोडून दिल्याने काही फरक पडणार नाही. देश आणि राज्यातील सत्ताधाऱ्यांच्या भीतीने आणि आकर्षणामुळे काही लोक त्यांना जाऊ लागले आहेत. महापालिकेत काँग्रेसकडून ज्यांनी महत्त्वाच्या पदांवर काम केले, त्यांनी पक्षाचा पाठ असताना काळ्या काळात साथ सोडली आहे. त्यांना जाऊ द्या, आपण पूर्ण ताकदीने लढू आणि जिंकलो पाहिजे. सामान्य कार्यकर्त्यांच्या जीवावर आपण निवडणूक लढवणार आहोत.

राज्यातील सत्ता बदलाची सुरुवात सांगलीतून करूया : विशाल पाटीलखासदार विशाल पाटील म्हणाले, जातीयवादी शक्तींना थांबवण्यासाठी आम्ही पूर्ण ताकदीने लढणार आहोत. देश आणि राज्यात सत्ता बदलाची सुरुवात सांगलीतूनच करायची आहे. काँग्रेस हा सर्वसमावेशक पक्ष आहे. सांगली हे काँग्रेसचे बालेकिल्ला होते आणि ते पुन्हा जिंकायचे आहे. महापालिकेच्या सत्तेत जाण्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने उभे राहायचे आहे, त्यासाठी आमची पूर्ण ताकद तुमच्या सोबत असेल.

मंगेश चव्हाण झाले निवडणुकीचे प्रमुखकाँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष पदासाठी मंगेश चव्हाण इच्छुक होते आणि आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी त्यांची शिफारस केली होती, मात्र राजेश नाईक यांना संधी मिळाली. म्हणून मंगेश चव्हाण यांना महापालिका निवडणूक प्रमुख व प्रचार प्रमुख पदे देण्यात आली. त्यांनाही डॉ. कदम यांच्या हस्ते नियुक्तीचे पत्र देण्यात आले.

कुणी कितीही भांडणं लावली तरी फरक पडणार नाहीकाँग्रेसचे नूतन शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक यांची निवडही डॉ. विश्वजित कदम यांनीच केली असून, आम्ही एकमताने आणि एकदिलाने काम करत आहोत. कुणी कितीही भांडणं लावली किंवा तेल ओतले तरी काही फरक पडणार नाही, असा टोला खासदार विशाल पाटील यांनी विरोधकांना लगावला.

English
हिंदी सारांश
Web Title : Congress Leaders Deserted Party for Selfish Gains: Vishwajeet Kadam

Web Summary : Vishwajeet Kadam criticized leaders who left Congress for selfish reasons after enjoying power. He expressed confidence that the party would win the upcoming municipal elections with the support of its workers and voters. Rajesh Naik was appointed as the new city president, and Mangesh Chavan was made the election head.
टॅग्स :Sangli Miraj Kupwad Municipal Corporation Electionसांगली मिरज कुपवड महानगरपालिका निवडणूक २०२६SangliसांगलीMunicipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६congressकाँग्रेसVishwajeet Kadamविश्वजीत कदमvishal patilविशाल पाटील