शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापन न करणाऱ्यांचे नूतनीकरण करू नये : चौधरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 14:30 IST

जैववैद्यकीय कचरा (बायोमेडिकल वेस्ट) अंतर्गत सांगली जिल्ह्यात शासकीय, खाजगी, शहरी व ग्रामीण आरोग्य सेवा राबवत असताना जैव वैद्यकीय कचरा विल्हेवाट व हाताळणीबाबत कायदेशीर चौकट आखून देण्यात आली आहे. या सूचनांची प्रभावी अंमलबजावणी करणे बंधनकारक आहे. ज्या वैद्यकीय आस्थापना याचे पालन करणार नाहीत, त्यांचे बाँबे नर्सिंग ॲक्ट अंतर्गत नूतनीकरण करू नये, अशा सक्त सूचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी आज येथे दिल्या.

ठळक मुद्देजैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापन न करणाऱ्यांचे नूतनीकरण करू नयेबायोमेडिकल वेस्ट जिल्हास्तरीय नियंत्रण सभेत दिले निर्देश

सांगली : जैववैद्यकीय कचरा (बायोमेडिकल वेस्ट) अंतर्गत सांगली जिल्ह्यात शासकीय, खाजगी, शहरी व ग्रामीण आरोग्य सेवा राबवत असताना जैव वैद्यकीय कचरा विल्हेवाट व हाताळणीबाबत कायदेशीर चौकट आखून देण्यात आली आहे. या सूचनांची प्रभावी अंमलबजावणी करणे बंधनकारक आहे. ज्या वैद्यकीय आस्थापना याचे पालन करणार नाहीत, त्यांचे बाँबे नर्सिंग ॲक्ट अंतर्गत नूतनीकरण करू नये, अशा सक्त सूचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी आज येथे दिल्या.बायोमेडिकल वेस्टसाठी सांगली जिल्हास्तरीय नियंत्रण समितीच्या सभेच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भूपाल गिरीगोसावी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी उत्तम माने, अतिरीक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे, महानगरपालिका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील आंबोळे, इंडियन मेडिकल असोसिएशन, सांगलीचे अध्यक्ष डॉ. रणजीतसिंह जाधव, सूर्या बायोमेडिकलच्या व्यवस्थापिका मेघना कोरे यांच्यासह वैद्यकीय अधिकारी, मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, वैद्यकीय क्षेत्राशी निगडित इतर आस्थापना जसे की पॅथॉलॉजी लॅबोरेटरीज, डे केअर सेंटर, डे केअर क्लिनिक, तसेच दंतशल्य चिकित्सकांचे दवाखाने या ठिकाणी आणि ज्या ठिकाणी जैववैद्यकीय कचरा निर्माण होतो, अशा सर्व ठिकाणी जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन नियम लागू आहे. त्यामुळे जैववैद्यकीय कचऱ्याची शास्त्रोक्त पदधतीने विल्हेवाट लावणे बंधनकारक आहे, असे त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, जैववैद्यकीय कचरा संकलन, त्याचे विलगीकरण व विल्हेवाट या गोष्टी नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. त्याचा वातावरणावर दुष्परिणाम होऊ नये. त्यामुळे जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापनासाठी सूर्या कंपनीने सुरू केलेली बार कोड पद्धत चांगली आहे. त्याचबरोबर महानगरपालिकेने त्यांचा बंद असलेला प्रकल्प सुरू करण्याची कार्यवाही करावी.

उघड्यावर जैववैद्यकीय कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी. आवश्यक तेथे वैद्यकीय आस्थापनांतील कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घ्यावे, असे त्यांनी सांगितले. यावेळी जैववैद्यकीय कचरा निर्मिती व त्याची विल्हेवाट याबाबत आढावा घेण्यात आला. मेघना कोरे यांनी सूर्या कंपनीच्या प्रकल्पाबद्दल सादरीकरण केले. डॉ. संजय साळुंखे यांनी प्रास्ताविक केले.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीSangliसांगली