शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

रिलायन्स ज्वेल्स दरोड्यातील तिसरा साथीदार अटकेत, सांगली पोलिसांनी बिहारमध्ये केली कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2023 15:58 IST

संशयिताने उगारले होते पिस्तूल

सांगली : येथील मार्केट यार्डजवळील ‘रिलायन्स ज्वेल्स’ दरोड्याचा मास्टरमाइंड सुबोधसिंग आणि अंकुरप्रताप रामकुमार सिंग या दोघांनंतर तिसरा साथीदार महंमद शमशाद महंमद मुख्तार (वय २३, रा. चेरिया, जि. बेगुसराय, बिहार) याला अटक करण्यात यश मिळाले. महंमद याने दरोड्यावेळी पिस्तूल घेऊन दहशत माजविली होती. बिहारमध्ये गेलेल्या पथकाने ही कारवाई करून त्याला सांगलीत आणले. मुख्तार याला न्यायालयासमोर हजर केल्यानंतर १० दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, मार्केट यार्ड परिसरातील रिलायन्स ज्वेल्स या सराफी पेढीवर सहा महिन्यांपूर्वी सुबोधसिंग याच्या टोळीने भरदुपारी दरोडा टाकला. पोलिस असल्याचे सांगत सर्व कर्मचाऱ्यांना एकत्र बोलावत पिस्तूल उंचावत कर्मचाऱ्यांचे हात-पाय बांधून पावणेसात कोटींचे दागिने गोळा केले. दागिने घेऊन जाताना एक ग्राहक आतमध्ये येऊन परत जात असताना त्याच्यावर गोळीबारही केला. सुदैवाने तो बचावला.भरदिवसा पडलेल्या दरोड्यानंतर पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले होते; परंतु पोलिसांनी कसून आणि खोलवर तपास करत दरोड्यात सहभागी असलेल्यांची पहिल्या टप्प्यात नावे निष्पन्न केली. बिहारमध्ये पथके रवाना केली. तेथे राहून तपास केला.दरोड्यावेळी मोटार चालवणारा चालक अंकुरप्रताप सिंग याच्या प्रथम मुसक्या आवळल्या. त्याला ताब्यात घेतल्यानंतर मास्टरमाइंड आणि देशातील कुख्यात ज्वेल थीफ सुबोधसिंग याला अटक करण्यासाठी तयारी केली; परंतु बिहारमधील कारागृहातून त्याला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली.त्यानंतर तो ताब्यात आला असून सध्या पोलिस कोठडीत आहे. सुबोधसिंगच्या अटकेनंतर बिहारमध्ये जाऊन तळ ठोकून राहिलेल्या पथकाने तांत्रिक पुरावे आणि गोपनीय माहितीच्या आधारे महंमद मुख्तार याला चेरिया गावात जाऊन ताब्यात घेतले. त्याच्या घरावर छापा टाकून त्याच्या मुसक्या आवळल्या. महंमद मुख्तार याने दरोड्यावेळी टोळीतील सदस्यांची बनावट कागदपत्रे तयार केली. त्याच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा एक गुन्हा दाखल आहे.मुख्तार गावामध्ये सेंट्रिंगचे काम करत होता. एका गुन्ह्यात बेऊर कारागृहामध्ये होता. त्यावेळी सुबोधसिंगच्या संपर्कात येऊन टोळीत सहभागी झाला. रिलायन्स ज्वेल्समध्ये दरोडा पडला त्यावेळी टोळीसोबत होता. पिस्तूल घेऊन शोरूममध्ये कर्मचाऱ्यांना धमकावले. सांगली पोलिसांचे यशरिलायन्स दरोड्यातील तिघांना अटक करण्यात आतापर्यंत पोलिसांना यश मिळाले आहे. आता उर्वरित साथीदार गणेश बद्रेवार, प्रताप राणा, कार्तिक मुजुमदार, प्रिन्सकुमार सिंग या संशयितांना अटक करणे बाकी आहे. त्या दृष्टीने तपास सुरू आहे.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस