शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: बुटात लपवलेली चावी, फ्लॅट उघडून चोरट्याने मारला ५ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 18:14 IST

पाळत ठेऊन चोरी

सांगली : फ्लॅट बाहेर ठेवलेल्या बुटात लपवलेली चावी घेऊन चोरट्याने आरामात फ्लॅट उघडून आतमध्ये प्रवेश केला. त्यानंतर कपाट व लॉकर फोडून दागिन्यांसह रोख रक्कम असे एकूण ५ लाख ४४ हजारांची चोरी केली. ही घटना गावभागातील संग्राम चौक जवळील जय अपार्टमेंटच्या फ्लॅट नं १३ मध्ये सोमवारी दुपारी घडली. याबाबत किरण केसरे यांनी फिर्याद दिली आहे.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सांगलीच्या गाव भागातील संग्राम चौक जवळील जय अपार्टमेंटमध्ये १३ क्रमांकाचा फ्लॅट किरण गजानन केसरे (वय ५०, व्यवसाय खासगी नोकरी) यांचा आहे. ते सोमवारी सकाळी फ्लॅटला कुलूप घालून बाहेर गेले होते. यावेळी फ्लॅटच्या बाहेर असलेल्या बुटात फ्लॅटची चावी होती. ती चावी घेऊन अज्ञात चोरट्याने फ्लॅटचा दरवाजा उघडून आत प्रवेश केला. तसेच हॉलमधील तिजोरीचे दरवाजे व लॉकर त्याने फोडले.त्यामध्ये असलेले सोन्याचे कानातील टॉप्स, नेकलेस, मणी, टिक्की, जेंट्स व लेडीज अंगठी, दोन लहान अंगठी, कानातील रिंग, वेढणी, कानातील झुबे, दोन बोरमाळ असे एकूण साडेसात तोळ्याहून अधिकचे सोन्याचे दागिने, १० ग्रॅम वजनाचे चांदीचे जास्वंदी फूल आणि रोख २५ हजार रक्कम असा एकूण ५ लाख ४४ हजारांचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केला. सदरची घटना सोमवारी सकाळी ११ ते दुपारी अडीचच्या दरम्यान घडली. दुपारनंतर किरण हे घरी आल्यावर फ्लॅटमध्ये चोरी झाल्याचे त्यांना समजले.याबाबत केसरे यांनी सांगली शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. घटनास्थळी पंचनामा करुन डॉग स्कॉड, फिंगरप्रिंट पथक यांनी तपासणी केली. तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी प्रणील गिल्डा यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.पाळत ठेऊन चोरीफ्लॅटच्या बाहेर ठेवलेल्या बुटात फ्लॅटची चावी होती. ती चावी घेऊन चोरट्याने फ्लॅटमध्ये प्रवेश केला होता. बुटातील चावी संदर्भात कुटुंबीयांच्या जवळच्या व्यक्तींना माहिती असणार किंवा पाळत ठेऊन फ्लॅटची चावी कोठे असते हे माहिती करुन घेऊन चोरट्याने चोरी केली आहे. या दिशेने पोलिसांचा तपास सुरु आहे.