...तर नौटंकी करणाऱ्यांच्या अंगावर कपडेही शिल्लक राहिले नसते- गोपीचंद पडळकर

By अविनाश कोळी | Published: December 10, 2023 07:05 PM2023-12-10T19:05:58+5:302023-12-10T19:06:06+5:30

इंदापूर येथील चप्पलफेकीच्या घटनेबाबत हल्लाबोल

... then those who perform gimmicks would not even have clothes left on them - Gopichand Padalkar | ...तर नौटंकी करणाऱ्यांच्या अंगावर कपडेही शिल्लक राहिले नसते- गोपीचंद पडळकर

...तर नौटंकी करणाऱ्यांच्या अंगावर कपडेही शिल्लक राहिले नसते- गोपीचंद पडळकर

आटपाडी :  ओबीसी समाज अत्यंत सयंमाने व शांततेत एल्गार मेळ्याव्यात आपल्या हक्काच्या आरक्षणाबाबत भूमिका मांडत आहे. इंदापूरची सभा संपल्यानंतर शेतकऱ्यांना दुधाचे दर मिळाले पाहिजेत, यासाठी सुरु असलेल्या आंदोलनास मी जात असताना काहींनी नौटंकी दाखविली.  यावेळी जर मी संयमाची भूमिका घेतली नसती तर त्या भेकडांच्या अंगावर कपडेही शिल्लक राहिले नसते, असे मत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केले. 

पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात आमदार पडळकर यांच्यावर चप्पल फेकीचा प्रयत्न झाल्यानंतर ओबीसी समाजामधून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत पडळकर यांनी पत्रकात म्हटले आहे की, ज्यांनी हा प्रकार केला त्यांनीच पुन्हा नौटंकीबाज करीत ही घटना माझ्याच कार्यकर्त्यांनी केल्याचा खोटा प्रचार केला. गरीब मराठा समाजला आरक्षण मिळालेच पाहिजे, ही आमची पूर्वीपासूनची भूमिका आहे. पण मराठा आरक्षणाच्या लढाईत घुसलेले काही समाजकंटक कधी कोणाची घरे जाळतात तर कधी कोणाला फोन करून शिव्या देतात. यावरून हेच स्पष्ट होते की, समाजकंटकांचा हेतू आरक्षण मिळवणे नसून समाजात अशांतता पसरवणे आहे.

यामागचा मुख्य सुत्रधार कोण आहे, हे आम्हा सगळ्यांना माहित आहे. तो स्वतःच्या मराठा समाजाच्या आरक्षणाचाही खरा शत्रू आहे. या घटनेचा निषेध हिंसेच्या मार्गाने करू नये. राज्यात शांतता ठेवावी, असे आवाहन मी धनगर समाजाला केले आहे.

Web Title: ... then those who perform gimmicks would not even have clothes left on them - Gopichand Padalkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.