शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

..तर ठेकेदारावर कारवाई अटळ, सांगली जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त सीईओंचा इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 17:49 IST

अनुसूचित जाती-नवबौद्ध विकासकामांची आढावा बैठक

सांगली : अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या कामांना तातडीने गती दिली पाहिजे. ज्या ठेकेदार, अधिकाऱ्यांकडून योजना पूर्ण होण्यात दुर्लक्ष झाले आहे, त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव यांनी दिला.जिल्हा परिषद सभागृहात आयोजित आढावा बैठकीत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जाधव बोलत होते. यावेळी जिल्हा समाजकल्याण अधिकारी संदीप कोटकर, विविध तालुक्यांचे सहायक गटविकास अधिकारी, अपूर्ण कामे असलेल्या ग्रामपंचायतींचे ग्रामविकास अधिकारी उपस्थित होते.जिल्ह्यातील मिरज, जत, पलूस आणि कवठेमहांकाळ या चार तालुक्यांमध्ये कामांची गती अपेक्षेपेक्षा कमी असल्याचे निदर्शनास आले. संबंधित ग्रामविकास अधिकाऱ्यांकडून कारणे विचारण्यात आली आणि प्रलंबित कामांचा स्वतंत्र आढावा घेतल्याचे जाधव यांनी स्पष्ट केले. जाधव म्हणाले, २०२३-२४ मधील सर्व प्रलंबित कामे २८ फेब्रुवारी २०२६ अखेर पूर्ण करावीत, तसेच सन २०२४-२५ मधील कामे १० मार्च २०२६ पर्यंत मार्गी लावावीत, असे सक्त आदेश दिले आहेत. पुढील आर्थिक वर्षातील प्रस्तावित कामांबाबतही नियोजनबद्ध अंमलबजावणी करण्याच्या सूचना देत वेळेत कार्यारंभ आदेश निर्गमित करण्यावर भर देण्यात आला.“अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या विकासासाठी शासन कटिबद्ध आहे. कोणत्याही प्रकारची टाळाटाळ किंवा दिरंगाई सहन केली जाणार नाही. निर्धारित मुदतीत कामे पूर्ण करणे ही सर्व संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे,” असेही त्यांनी अधिकाऱ्यांना इशारा दिला.

कामांच्या गुणवत्तेबाबत तडजोड नको : मनोज जाधवप्रलंबित कामांबाबत संबंधित ग्रामपंचायतींवर आवश्यक ती प्रशासकीय कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल, असा इशाराही मनोज जाधव यांनी दिला. तसेच कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड न करता पारदर्शकतेने आणि वेळेत कामे पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. विकासकामे वेळेत पूर्ण झाल्यास अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडेल, असा विश्वास व्यक्त करत प्रशासनाने ठोस कृती आराखडा तयार करण्यावर भर द्यावा, अशा सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिला.

English
हिंदी सारांश
Web Title : Action Imminent on Contractors Delaying Works: Sangli Zilla Parishad CEO Warns

Web Summary : Contractors delaying development work for Scheduled Castes and Neo-Buddhists in Sangli face action. Zilla Parishad CEO Manoj Jadhav has ordered officials to complete pending projects by February 2026, ensuring quality and transparency. Delays will not be tolerated.