शहरं
Join us  
Trending Stories
1
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
4
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
5
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
6
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
7
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
8
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
9
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
10
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
11
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
12
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
13
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
14
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
15
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
16
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
17
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
18
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
19
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
20
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'

भिलवडीत कापड दुकान फोडून रोख रकमेसह पाच लाखांचा माल लंपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2022 19:03 IST

भिलवडी : भिलवडी, ता. पलुस येथे मेन रस्त्यावरील राज वस्त्रम हे कापड दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी महागड्या साड्या, कपडे ...

भिलवडी : भिलवडी, ता. पलुस येथे मेन रस्त्यावरील राज वस्त्रम हे कापड दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी महागड्या साड्या, कपडे व ६० हजार रुपये रोख रकमेसह अंदाजे पाच लाख १२ हजार रुपयांचा माल लंपास केला. ही घटना रविवारी रात्री घडली. यावेळी वादळी वाऱ्यासह सुरू असलेला पाऊस व खंडित वीजपुरवठा याच फायदा घेत चोरट्यांनी धाडसी चोरी केली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोंडेही उलट दिशेला फिरवल्याचे दिसून आले.भिलवडी व्यापारी संघटनेचे पदाधिकारी व राज वस्त्रमचे मालक महेश सदाशिव शेटे यांनी भिलवडी पोलिसांत चोरीच्या घटनेबाबत फिर्याद दिली आहे. भिलवडी पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक कैलास कोडग यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. सांगलीहून आणलेले श्वानपथक दुकानाच्या परिसरातच घुटमळत होते. चार लाख रुपयांच्या नामवंत कंपनीच्या महागड्या साड्या, पस्तीस हजार रुपयांचे कापड, ६० हजार रुपये रोख रक्कम व १८ हजार ५०० रुपये किमतीची डीव्हीआर व हार्ड डिस्क असा एकूण पाच लाख १३ हजार रुपयांचा माल लांबाविला आहे.पोलीस व प्रत्यक्ष घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, महेश शेटे यांचा मुलगा मनीष शेटे सोमवारी सकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान दुकान उघडण्यासाठी गेला असता शटरच्या दरवाजाच्या लोखंडी पट्ट्या ग्राइंडरने कापून कुलूप काढले असल्याचे निदर्शनास आले. त्याने दरवाजा उघडून आत प्रवेश केल्यावर चोरीचा प्रकार घडला असल्याचे लक्षात आले. त्यांनी संगणक सुरू करून सीसीटीव्ही फूटेजची तपासणी सुरू केली असता चोरट्यांनी डीव्हीआर व हार्ड डिस्क काढून नेले असून दुकानाच्या बाहेर व आत असणाऱ्या सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोंडेही उलट दिशेला फिरवली होती.सदर घटनेतील चोरटे हे सराईत असावेत, असा पोलिसांचा अंदाज आहे. भिलवडी परिसरात लहान-मोठ्या प्रमाणात चोरीच्या घटना वारंवार घडत असून पोलिसांनी त्यांचा तत्काळ छडा लावा, अशी मागणी व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारी