शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

हृदयद्रावक! वाहनाने ठोकरले...जीव गेल्यावरही असंख्य गाड्यांनी मृतदेहाला चिरडले; मिरजेतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2022 13:35 IST

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मृतदेहावरून शेकडो वाहने गेली. मृतदेह रस्त्यावरून बाजूला करण्याचे सौजन्य कोणीही दाखविले नाही. या प्रकाराने माणुसकी जिवंत आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मिरज : निलजी-बामणी (ता. मिरज) येथे रस्त्याच्या कडेने चालत निघालेल्या अनोळखी पादचाऱ्याचा अज्ञात वाहनाच्या धडकेत जीव गेला. अपघातग्रस्त वाहन घटनास्थळावरून पसार झाले; मात्र त्यानंतर रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मृतदेहावरून शेकडो वाहने गेली. अक्षरश: चिंधड्या झाल्या. मृतदेह रस्त्यावरून बाजूला करण्याचे सौजन्य कोणीही दाखविले नाही. रविवारी सकाळी घडलेल्या या प्रकाराने माणुसकी जिवंत आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.रत्नागिरी-नागपूर महामार्गावर निलजी-बामणी हद्दीत हा अपघात घडला. मृत ३५ वर्षांचा तरुण बेघर असून, निलजी परिसरात कोठेही फिरत असल्याचे सांगण्यात आले. रविवार, ११ डिसेंबर रोजी सकाळी आठच्या सुमारास तो रस्त्याच्या कडेने चालत निघाला होता. यादरम्यान अज्ञात वाहनाने त्याला धडक दिली. भरधाव वाहनचालकास अपघात झाल्याचे कळले की नाही, हाही प्रश्नच;

मात्र अपघातानंतर भररस्त्यात पडलेल्या मृतदेहावरून नंतरच्या तासाभरात शेकडो वाहने गेली. कोणीही मृतदेह रस्त्यावरून बाजूला करण्याचे अथवा मृतदेहावरून जाणाऱ्या वाहनांना अटकाव करण्याचे सौजन्य दाखविले नाही. शेकडो वाहने अंगावरून गेल्याने मृतदेहाच्या अक्षरश: चिंधड्या झाल्या.याबाबतची माहिती मिळताच पोलिसपाटील रफिक अहमद महमद इसाक पाटील यांनी मिरज ग्रामीण पोलिसांना अपघाताविषयी कळविले. पोलिस पथक तत्काळ घटनास्थळी धावले. मृतदेहाचे तुकडे अक्षरश: पोत्यात भरून नेण्याची वेळ पोलिसांवर आली. मनाला चटका लावणाऱ्या या घटनेबाबत परिसरात हळहळ व्यक्त होत होती. मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद झाली असून अधिक तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :SangliसांगलीAccidentअपघातDeathमृत्यूPoliceपोलिस