शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
2
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
3
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
4
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
5
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
6
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
7
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
8
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
9
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
10
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
11
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
12
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
13
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
14
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
15
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
16
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
17
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
18
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
19
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
Daily Top 2Weekly Top 5

ठाकरे बंधू एकत्र आल्याने महायुतीलाच फायदा : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 17:20 IST

'भाजप छोटे पक्ष संपवितो, असा आरोप केला जातो, तो चुकीचा'

सांगली : मुंबईसह राज्यातील सर्व महापालिका निवडणुका महायुती म्हणून लढण्याचा निर्णय झाला आहे. मुंबईत उद्धवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मनसेप्रमुख राज ठाकरे एकत्र आल्याने महायुतीला कोणताही फटका बसणार नाही. उलट अमराठी मतांचा फायदा महायुतीलाच होईल, असा दावा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला. राज ठाकरे चांगले नेते आहेत, त्यांच्या सभांना मोठी गर्दी असते, पण त्यांना मते मिळत नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला.मंत्री आठवले रविवारी सांगली दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. नागपूरमध्ये महायुतीचा निर्णय झाल्याचे सांगत, आगामी महापालिका निवडणुकीमध्ये भाजप, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत रिपाइं एकत्र लढणार आहे. आम्ही २०१२ पासून एनडीए सोबत आहोत. एकही खासदार नसताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला दहा वर्षे मंत्रीपद दिले आहे. भाजप छोटे पक्ष संपवितो, असा आरोप केला जातो, तो चुकीचा असून, आम्ही नागालँड, मणिपूरपासून महाराष्ट्रापर्यंत पक्षाची वाढ केली आहे.मुंबई महापालिका महायुतीसाठी महत्त्वाची असून, ठाकरेंच्या हातून महापालिका हिसकावून घेण्याचे नियोजन झाले आहे. मुंबईत महायुतीचा महापौर होईल, असा विश्वासही आठवले यांनी व्यक्त केला. रिपाइंने मुंबईत २५ जागांची तयारी केली आहे. त्यापैकी १५ ते १६ जागांची मागणी राहील, असेही त्यांनी सांगितले. उद्धव ठाकरे व राज ठाकरे एकत्र आल्याने अमराठी मते त्यांना मिळणार नाहीत, असा दावा करीत मुंबईत ४० टक्के मराठी मते आहेत.मराठी मतात भाजप, काँग्रेस व ठाकरे यांचाही वाट असेल. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका ठाकरे बंधू विसरले आहेत. पूर्वी शिवसेनेने गुजराती सेना, उत्तर भारतीय सेना तयार केली. मुस्लिमांच्या मतांचे पाठबळ होते. मात्र, राज ठाकरे हे सोबत आल्याने उद्धव ठाकरे यांचे नुकसान होणार आहे. लोकसभा, विधानसभेचा दाखला देत आठवले म्हणाले की, लोकसभेवेळी राज ठाकरे महायुतीसोबत होते, त्यांचा फार फायदा झाला नाही. विधानसभेवेळी ते सोबत नव्हते, तेव्हा महायुतीने चांगले यश मिळविल्याचे त्यांनी सांगितले.मतचोरीच्या आरोपाबाबत ते म्हणाले की, मतदार यादीत एकाच व्यक्तीचे नाव अनेक ठिकाणी आहे. एकाच पत्त्यावर ४० हून अधिक लोकांची नावे आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाने मतदार यादीत दुरुस्ती करावी, अशी रिपाइंची भूमिका आहे. मतचोरीबाबत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे आरोप चुकीचे आहेत. तसे असेल, तर लोकसभेवेळी मतचोरी झाली होती का?, असा सवालही त्यांनी केला. मतदार यादी दुरुस्तीसाठी एसआयआरचा निर्णय आयोगाने घेतल्याचे ते म्हणाले.

सांगलीत पाच ते सहा जागा मिळाव्यातसांगली महापालिका निवडणुकीत रिपाइंला पाच ते सहा जागा मिळाव्यात, अशी मागणी राज्यमंत्री आठवले यांनी केली. सांगलीसाठी इच्छुकांची यादी तयार केली आहे. लवकरच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा करणार आहोत, असेही ते म्हणाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Thackeray brothers' unity benefits Mahayuti: Union Minister Ramdas Athawale

Web Summary : Ramdas Athawale claims Thackeray's alliance won't harm Mahayuti in Mumbai's municipal elections. Amraathi votes will benefit them. BJP, Shinde Sena, and Ajit Pawar's NCP will contest together. Mahayuti aims to win Mumbai's mayoral election.