शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

बेड्यांसह पळालेला संशयित २४ तासांत जेरबंद, सांगली कारागृहासमोर घडले थरारनाट्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2024 12:08 IST

पाेलिसांचे क्षणभर दुर्लक्ष झाले अन्..

सांगली : खुनातील संशयित लक्ष्मण अण्णा चौगुले (वय ३०, रा. वडर वस्ती, विटा) याने वैद्यकीय तपासणीनंतर जिल्हा कारागृहात जाण्यापूर्वी पोलिसांना हिसडा मारून बेड्यासह पलायन केल्याचा प्रकार शनिवारी मध्यरात्री घडला होता. चौगुले याच्या पलायनानंतर खळबळ उडाली होती. स्थानिक गुन्हे अन्वेषणसह शहर पोलिसांच्या पथकाने तत्काळ शोधमोहीम राबवली. रविवारी सायंकाळी त्याला कृष्णाघाटावरील जनावरांच्या बाजार परिसरात पकडले.२०१८ मध्ये झालेल्या एका खुनात लक्ष्मण चौगुले हा संशयित आहे. जिल्हा कारागृहात तो न्यायालयीन कोठडीत होता. काही दिवसांपासून त्याला लघवीचा त्रास सुरू होता, तसेच पायदेखील लुळे पडत होते. त्यामुळे सांगलीत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तपासणी केली. नंतर कोल्हापूरच्या सीपीआरमध्ये उपचारासाठी पाठवले होते. तेथून त्याला ससून रुग्णालयात तपासणीसाठी पाठवण्याची शिफारस केली होती. लक्ष्मण याला शनिवारी सकाळी पोलिस मुख्यालयातील कर्मचाऱ्यांनी ससूनला नेले होते. तेथे उपचार केल्यानंतर रात्री ११:३० वाजेच्या सुमारास त्याला सांगलीत आणले. जिल्हा कारागृहात आतमध्ये सोडण्यापूर्वी सहायक फौजदार पाटील यांना छातीत दुखत असल्यामुळे त्रास होऊ लागला. ते गाडीतून उतरून खाली बसताच दोघे सहकारी मदतीसाठी धावले. याच क्षणाचा फायदा घेत लक्ष्मण याने बेड्यासह धूम ठोकली. त्यामुळे पोलिसांची पळापळ झाली. कारागृहातील पोलिस दरवाजा उघडून बाहेर येण्यापूर्वी लक्ष्मण अंधारात पसार झाला होता. पोलिसांनी रात्रभर शोधमोहीम राबवली; परंतु तो हाती लागला नाही. रविवारी त्याचा सर्वत्र शोध सुरू होता. सायंकाळी जनावरांच्या बाजार परिसरात त्याला संशयास्पदरीत्या फिरताना पकडले. त्यानंतर शहर पोलिसांच्या ताब्यात दिले.

पाेलिसांचे क्षणभर दुर्लक्ष झाले अन्..संशयित लक्ष्मणला पुणे येथून सांगलीत आणताना वाटेत सहायक फौजदार पाटील यांना इस्लामपूर येथे त्रास होऊ लागला. त्यांनी गाडी न थांबवता थेट सांगलीत येण्याचा निर्णय घेतला. रात्री ११:३० वाजता कारागृहासमोर गाडीतून उतरून ते थोडावेळ खाली बसले. चालक व पोलिस कर्मचारी त्यांच्याकडे धावले. तेवढ्यात लक्ष्मण बेड्यासह पळाला होता.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस