शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

खाऊच्या पानांच्या विक्रीवर मंदीचे सावट, मागणीत कमालीची घट; पानउत्पादक शेतकरी अडचणीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 18:49 IST

खाऊच्या पानांचा विडा रंगेना 

दिलीप कुंभारनरवाड : महाराष्ट्र व कर्नाटक सीमाभागातील हजारोंच्या हाताला काम देणाऱ्या खाऊच्या पानांना बाजारपेठेत कवडीमोलाची किंमत मिळू लागल्याने हा व्यवसाय डबघाईस आला आहे. सांगली जिल्ह्यातील विशेषतः मिरज तालुक्यातील पुर्व भागात पान उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. २५० हेक्टर पानमळे संपूर्ण महाराष्ट्रात पान खवैयांची पान खाण्याची इच्छा पुरवितात. याशिवाय महाराष्ट्र व कर्नाटक सीमाभागातील कर्नाटकातील चिक्कोडी भागातही पानमळे मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. मिरज तालुक्यातील नरवाड, बेडग, मालगांव, आरग आदी भागात पानमळ्यांचे क्षेत्र अधिक पहावयास मिळते. यामध्ये नरवाड व बेडग पानमळ्यांचे आगार समजले जाते.कर्नाटकातील चिन्नूर, बेळूर, लोकूर आदी भागात पानमळ्यांचे अस्तित्व अजूनही टिकून आहे. यासाठी सर्वत्र ''कपूरी'' जातीच्या पानवेलींची पान उत्पादकांनी बियाणे (कलम) साठी निवड केली आहे. मात्र सद्यस्थितीत भारतीय सण समारंभ वगळता इतर वेळी पानांना पान बाजारपेठेत मागणी नसल्याने पानांना कवडीमोलाची किंमत मिळू लागली आहे.परिणामी पान उत्पादकांपासून वितरकांपर्यंत अर्थकारण बिघडले गेले आहे. याचा सर्वाधिक फटका पान उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. पानबाजारात पानांचे दर घसरल्याने कळी, फापडा, हक्कल या पानांच्या विक्रीवर मंदीचे सावट पसरले आहे.पानांचे सध्याचे दर रुपयांतपानांची प्रत - यापूर्वीचा दर - आत्ताचा दरकळी - ५०० ते ३००० - २०० ते १५००फापडा - ४०० ते २००० - २०० ते ९००हक्कल - १५० ते २५० - १०० ते २००

पानांचे दर घसरल्याने पान उत्पादकांना शेतमजुरांचा पगार भागविताना पदरमोड करावी लागत आहे. याबाबत बेडगचे पान वखारदार शशिकांत नलवडे म्हणाले, सध्या तरुणाई गुटख्याच्या आहारी गेली आहे. याशिवाय लग्नकार्यातही पूर्वीप्रमाणे पानसुपारी देण्याची पद्धत लोप पावत चालली आहे. पानांना दर केवळ एखाद्या सणापुरता मिळतो - शशिकांत नलवडे, पान वखारदार, बेडगशासनाने गुटख्यावर बंदी घातली आहे, परंतु त्याची कडक अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. पान उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना मदत करणे गरजेचे आहे. - मधुकर जाधव, पान उत्पादक शेतकरी.

English
हिंदी सारांश
Web Title : Slump in Betel Leaf Sales Hurts Farmers; Demand Plummets.

Web Summary : Betel leaf farmers in Maharashtra and Karnataka face hardship due to drastically reduced prices. Demand is down except during festivals, impacting growers and distributors alike. Gutkha consumption and changing traditions contribute to the crisis.