शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

दीड हजारावर प्राध्यापकांची पदे भरण्याचा प्रस्ताव रखडला; शासनाने दुर्लक्ष केल्यास राज्यातील शिक्षक रस्त्यावर उतरणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2024 15:36 IST

शासनाचे उच्च शिक्षणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष

सांगली : राज्यातील १ हजार ५०० प्राध्यापकांच्या भरतीचा प्रस्ताव मान्यतेसाठी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे गेल्या अनेक महिन्यांपासून पडून आहे. या प्रस्तावास त्यांनी तातडीने मंजुरी दिली नाही तर राज्यातील शिक्षक, संस्थाचालक रस्त्यावर उतरून आंदोलन करतील, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी शिक्षक संघटनेचे राज्य कार्यकारिणी अध्यक्ष प्रा. एन. डी. बिरनाळे यांनी दिला आहे.प्रा. बिरनाळे म्हणाले, वरिष्ठ महाविद्यालयीन रिक्त सहायक प्राध्यापकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर त्याचा परिणाम झाला आहे. म्हणून राज्य शासनाने विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागण्यापूर्वी खासगी शिक्षण संस्थांनी मागणी केल्याप्रमाणे पूर्णवेळ पदांना मंजुरी देऊन ३० सप्टेंबरपर्यंत पद भरती प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे. गेली तीन वर्षे सलग अनुदानित तासिका तत्त्वावरील पदांवर कार्यरत आणि यूजीसी नियमाप्रमाणे पात्रताधारक विद्यापीठाने सलग तीन वर्षे मान्यता दिली आहे. या सहायक प्राध्यापकांना पूर्वलक्षी प्रभावाने प्रथम नियुक्ती दिनांकापासून सेवासातत्य देऊन त्यांना पूर्णवेळ सहायक प्राध्यापक पदावर कायम करावे. २०२४ - २५ या शैक्षणिक वर्षात नियुक्त अनुदानित तासिका तत्त्वावरील सहायक प्राध्यापकांच्या नियुक्त्यांना विद्यापीठानी तातडीने मान्यता देणे गरजेचे आहे. उच्च शिक्षण सहसंचालकांनी त्यांचे गेल्या दोन महिन्यांपासून प्रलंबित पगार तातडीने त्यांच्या बँक खात्यात जमा करावे. हे निर्णय व कार्यवाही वेळेत झाली नाही तर सीएचबी प्राध्यापक सहकुटुंब रस्त्यावर उतरून आंदोलन करतील, असा इशाराही त्यांनी दिला.

शासनाचे उच्च शिक्षणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्षतासिका तत्त्वावरील प्राध्यापक प्रचंड आर्थिक अडचणीत आहेत. कुटुंब चालविणे त्यांना कठीण झाले आहे. या निराशेतून एखाद्या प्राध्यापकाने आत्महत्या केली तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि उच्च शिक्षण मंत्री यांच्यावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे नोंद होतील. राज्याला डॉक्टर, इंजिनिअर, वकील, शिक्षक, शासकीय अधिकारी घडविण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या उच्च शिक्षणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणारे शासन अक्षम्य अपराध करत आहे, असा आराेपही प्रा. एन. डी. बिरनाळे यांनी केला.

टॅग्स :SangliसांगलीProfessorप्राध्यापकGovernmentसरकार