शहरं
Join us  
Trending Stories
1
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
2
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
3
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
4
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
5
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
6
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
7
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
8
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
9
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
10
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
11
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
12
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
13
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
14
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
15
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
16
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
17
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
18
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
19
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
20
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)

सांगली महापालिकेच्या ठेवी मुदतीपूर्वीच वर्ग केल्याप्रकरणी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 15:24 IST

शासनाकडे अहवाल सादर : २३६ कोटींच्या ठेवी खासगी बँकांमध्ये वर्ग

सांगली : सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेच्या विविध राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये असलेल्या २३६ कोटी रुपयांच्या कायम ठेवी मुदतपूर्व काढून खासगी बँकांमध्ये वर्ग करण्यात आल्याप्रकरणी शासनाकडे अहवाल सादर झाला आहे. यामुळे तत्कालीन आयुक्त शुभम गुप्ता यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हे आहेत. त्यांच्याच काळात हे व्यवहार झाल्याने शासन आता कोणती कारवाई करणार, याकडे तक्रारदारांसह येथील सामाजिक संघटनांचे लक्ष लागले आहे.महापालिकेच्या कायम ठेवी पूर्वी कॅनरा बँक, युनियन बँक व बँक ऑफ महाराष्ट्रकडे होत्या. त्यांची मुदत संपलेली नसताना या सर्व ठेवी मोडून खासगी बँकांमध्ये ठेवण्यात आल्या. शहर व नागरिक विकास मंचने महापालिकेच्या या कृतीवर आक्षेप नोंदविला होता. महापालिकेने राष्ट्रीयीकृत बँकांमधील ठेवी मुदतपूर्व मोडल्यामुळे महापालिकेला एक ते दीड टक्के प्री-मॅच्युअर क्लोझर इंटरेस्ट पेनल्टी लागली. यातून ३ ते ४ कोटींचे नुकसान झाले आहे. हा नागरिकांचा कररूपी पैसा असल्याने याबाबत असा तडकाफडकी निर्णय का घेतला, असा सवाल उपस्थित झाला होता.

शुभम गुप्ता यांच्या कार्यकाळात हा निर्णय झाला होता. जेव्हा हे प्रकरण समोर आले, तेव्हा गुप्ता यांनी चौकशी करणार असल्याचे सांगितले होते. मात्र, प्रत्यक्षात त्यांच्या काळात याची चौकशी किंवा त्यासंदर्भातील कारवाई झाली नाही.गुप्ता यांच्या काळात झालेल्या अनेक कारभाराची चौकशी शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सुरू असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुकतीच दिली होती. गुप्ता यांच्या काळातील कामकाजाची चौकशी सुरू झाल्याने ठेवी प्रकरणावरून त्यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हे आहेत.

मुख्य लेखाधिकाऱ्यांची चौकशी सुरूमहापालिकेचे मुख्य लेखाधिकारी अभिजीत मेंगडे यांचीही या ठेवी वर्गप्रकरणी चौकशी सुरू झाली आहे. ठेवी वर्गचा आदेश नेमका कोणी दिला, ही गोष्ट या चौकशीतून बाहेर येण्याची चिन्हे आहेत. शासन आदेशाचे चुकीचे अर्थ लावून ठेवी वर्ग केल्याची बाब समोर आली असल्याने त्यात तत्कालीन आयुक्तांचीही चौकशी हाेण्याची चिन्हे आहेत.