शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
2
"सगळेच लोक अत्यंत...!"; विरोधकांच्या 'मत चोरी'च्या आरोपांवर मैथिली ठाकुरचं मोठं विधान, स्पष्टच बोलली
3
न्यायाधीशाची न्यायालयातच गोळ्या घालून हत्या; पिता-पुत्रही जखमी, सुनावणी सुरू असताना घडली घटना
4
Chaitanyananda Saraswati : स्वयंघोषित बाबाचं 'फाईव्ह स्टार' सीक्रेट; डीनने मुलींना दिली हॉटेलमध्ये रात्र घालवण्याची धमकी
5
VIDEO: वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात राडा! खूपच संतापला, भरमैदानात पंचांशी वाद घातला...
6
लोनवर Hero Splendor खरेदी करण्यासाठी किती डाउन पेमेंट करावं लागेल? किती लागेल मंथली EMI, जाणून घ्या
7
"सरकारने आज घोषित केलेली मदत म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा, शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी देणार?’’, काँग्रेसचा सवाल   
8
मोदी सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्रासह या राज्यांमध्ये चार नवीन रेल्वे प्रकल्पांना मंजुरी
9
"शेतकऱ्यांना पंजाबपेक्षा जास्त मदत दिली, तुलना करण्यापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना सुनावलं
10
इतक्या कोटींची मालकीण आहे २५ वर्षीय मैथिली ठाकूर! एका शोचे मानधन किती? बिहार निवडणुकीमुळे चर्चेत
11
“STला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करणे गरजेचे, कामगारांच्या मागण्यांवर शासन सकारात्मक”: सरनाईक
12
२ वर्षांच्या मुलीवर माकडांचा हल्ला; वडिलांसमोर छतावरुन खाली पडली, धडकी भरवणारा Video
13
“शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करणार, पण आज थेट मदतीची जास्त गरज”: CM देवेंद्र फडणवीस
14
शबरीमला मंदिरातील सोन्याच्या मुलाम्यात घोटाळा? न्यायालयात मोठा खुलासा, देवस्वम बोर्डाने आरोप फेटाळले
15
१४ वर्षांच्या उच्चांकी स्तराच्या जवळ 'या' सरकारी बँकेचे शेअर्स; रेखा झुनझुनवालांनी खरेदी केले आणखी शेअर्स
16
Y Puran Kumar: वाद आणि संघर्षांनी भरलेली कारकीर्द; कोण होते वरिष्ठ आयपीएस अधिकारी वाय. पूरन?
17
अतिवृष्टीचा फटका बसलेल्या कोरडवाहू, हंगामी बागायतदार आणि बागायतदार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी किती पैसे मिळणार?
18
UPI व्यवहारांच्या नियमामध्ये होणार बदल, ८ ऑक्टोबरपासून अशा प्रकारे करू शकाल पेमेंट
19
अतिवृष्टीग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना राज्य सरकारचा दिलासा; मुख्यमंत्री फडणवीसांनी केली घोषणा
20
भर कोर्टात बूट फेकण्याचा प्रयत्न, CJI भूषण गवई यांच्या आईची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...

सांगली जिल्ह्यातील तासगाव, खानापूर, पलूसमध्ये महिलाराज; जत, शिराळा खुले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 14:09 IST

नगराध्यक्षपदांची आरक्षणे जाहीर, इस्लामपूर, आटपाडीत ओबीसी, तर आष्ट्यात अनुसूचित पुरुष

सांगली : जिल्ह्यातील नगरपालिकांच्या नगराध्यक्षपदांचे आरक्षण सोमवारी जाहीर झाले. आरक्षण निश्चित झाल्याने राजकीय हालचालींना वेग येणार आहे. तासगावचे नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव घोषित झाले. यामुळे अनेक दिग्गज नेत्यांनी आता आपल्या सौभाग्यवतींना रिंगणात उतरविण्याची तयारी सुरू केली आहे.आटपाडीमध्ये इतर मागास प्रवर्गासाठी नगराध्यक्षपदी राखीव झाले. तेथे भाजपा व शिंदेसेनेतच खरी लढत होण्याची चिन्हे आहेत. या स्थितीत राष्ट्रवादी काॅंग्रेस व काॅंग्रेसची भूमिका काय असेल? याकडे लक्ष लागून राहिले आहे. नगरपंचायतीची ही पहिलीच निवडणूक आहे. ‘पुरुष सर्वसाधारण’ आरक्षण गृहीत धरून प्रचारयंत्रणा सज्ज केलेल्यांना धक्का बसला आहे. आता नेतेमंडळींना ओबीसी समाजातूनच उमेदवार निश्चित करावा लागणार आहे.खानापूरचे नगराध्यक्षपद इतर मागास महिलेसाठी आरक्षित झाले. नगरपंचायतीची मुदत पुढील वर्षी संपणार आहे. सध्या येथे आमदार सुहास बाबर व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुहास शिंदे गटाची सत्ता आहे.जतचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण झाले आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत तुफान रणसंग्राम रंगण्याची चिन्हे आहेत. पलूसमध्ये महिला राज आले आहे. काँग्रेस व भाजपमध्येच खरी लढत रंगण्याची शक्यता आहे. नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित झाले. त्यामुळे देव पाण्यात ठेवून बसलेल्या पुरुष कारभाऱ्यांचा भ्रमनिरास झाला आहे. महिला आरक्षणामुळे अनेक नवे चेहरे दिसण्याची शक्यता आहे.शिराळा नगराध्यक्षपद खुले झाले आहे. त्यामुळे इच्छुकांच्या भाऊगर्दीने राजकीय आखाडा तापला आहे. उमेदवार निश्चिती करताना नेतेमंडळींची तारेवरची कसरत होणार आहे. शिराळ्याच्या राजकारणात स्थानिक पातळीवर मानसिंगराव नाईक, शिवाजीराव नाईक हे दोन गट तर सत्यजित देशमुख, सम्राट महाडिक हे एकत्र आले आहेत. यावेळी शिंदेसेनाही रिंगणात आहे. त्यामुळे ही लढत ‘राष्ट्रवादी-राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजप-शिवसेना महायुती’ अशीच होण्याची शक्यता आहे. आष्टा नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद अनुसूचित जातीतील पुरुष उमेदवारासाठी आरक्षित झाले आहे. त्यामुळे खुल्या गटातील इच्छुक उमेदवारांच्या आशेवर पाणी पडले आहे. नगराध्यक्षपदाची संधी कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.इस्लामपूरचे नगराध्यक्षपद इतर मागास पुरुषासाठी राखीव झाले आहे. त्यामुळे खुल्या वर्गातील इच्छुक नेत्यांत अस्वस्थता आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Women's Reign in Tasgaon, Khanapur, Palus; Jat, Shirala Open

Web Summary : Sangli's municipal president positions are reserved, stirring political activity. Women dominate in Tasgaon, Khanapur, and Palus. Jat and Shirala are open, promising intense competition. Key leaders strategize amidst shifting political dynamics and new reservations.