शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत शेरीनाल्याचे मैलामिश्रीत पाणी थेट कृष्णा नदीत, प्रदूषण नियंत्रण विभागाचे डोळे कधी उघडणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 16:06 IST

महापालिकेच्या निष्क्रियतेवर नागरिकांचा संताप 

सांगली : शहरातील शेरीनाल्यातील मैलामिश्रीत सांडपाणी सांगलीतील अमरधाम स्मशानभूमीजवळ थेट कृष्णा नदीत मिसळत असल्याचा गंभीर प्रकार पुन्हा एकदा उघड झाला आहे. महापालिका प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ, याकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. संतप्त नागरिकांनी महापालिका प्रशासनाचे डोळे कधी उघडणार, असा सवाल उपस्थित केला आहे.महापालिका क्षेत्रातील गावभागातील अमरधाम स्मशानभूमीजवळील नाल्यातून मोठ्या प्रमाणात सांडपाणी कृष्णा नदीत मिसळत असल्याचे प्रत्यक्ष पाहणीत उघड झाले. शुक्रवार, दि. १३ मार्च रोजी सकाळी सुमारे साडेअकरा वाजण्याच्या सुमारास येथे पाहणी करण्यात आली असता, नाल्याचा उजव्या बाजूचा भाग फुटलेला दिसून आला. त्या ठिकाणाहून मैलामिश्रीत पाणी थेट नदीत वाहत होते. परिणामी, नदीचा मोठा भाग पांढऱ्या फेसाने भरलेला दिसत होता. प्रदूषित पाणी पुढे बंधाऱ्याच्या दिशेने वाहत असल्याने नदीपात्राचे गंभीर प्रदूषण होत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, शेरीनाल्यातील सर्व पंप कार्यान्वित करण्यात आल्याचा दावा प्रशासनाकडून वारंवार केला जात असला, तरी प्रत्यक्ष परिस्थिती त्याच्या पूर्णपणे विरोधात असल्याचे दिसून येत आहे. नागरिक आणि विविध सामाजिक संघटनांनी या प्रकाराबाबत अनेकदा तक्रारी करूनही महापालिका प्रशासन व प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

प्रदूषणास जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करा : रवींद्र वळवडेसृष्टी संवर्धन फाउंडेशनचे अध्यक्ष रवींद्र वळवडे यांनी या गंभीर प्रकाराची दखल घेत, शुक्रवारी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि प्रदूषण नियंत्रण अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. संबंधित ठिकाणी तातडीने स्थळ पाहणी करून सांडपाणी नदीत मिसळण्याचे कारण शोधून त्यावर त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे. कृष्णा नदीचे प्रदूषण रोखण्यात अपयशी ठरलेल्या संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून कठोर कारवाई करावी, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Sewage pollutes Krishna River in Sangli; authorities ignore the issue.

Web Summary : Untreated sewage from Sherinala is directly entering the Krishna River near Sangli's Amar Dham, causing severe pollution. Despite complaints, the municipality and pollution control board have failed to act, sparking public outrage and calls for accountability.