धक्कादायक! कुटुंब संपविण्याचा कट संपूर्ण घरालाच दिला शॉक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2023 06:25 IST2023-10-05T06:25:27+5:302023-10-05T06:25:54+5:30

गावात यूपी आणि बिहारला लाजवेल अशी क्रूर आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली.

The plot to end the family shocked the whole house | धक्कादायक! कुटुंब संपविण्याचा कट संपूर्ण घरालाच दिला शॉक

धक्कादायक! कुटुंब संपविण्याचा कट संपूर्ण घरालाच दिला शॉक

मोहन मोहिते

वांगी (सांगली) : वांगी (ता. कडेगाव) गावात यूपी आणि बिहारला लाजवेल अशी क्रूर आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली. थोर स्वातंत्र्य शाहीर शंकरराव निकम यांचा मोठा मुलगा अशोकराव निकम यांच्या घराला समोरच्या व मागील बाजूने विद्युत वाहक तारेतून ११ केव्हीचा मोठा शॉक देऊन संपूर्ण कुुटुंब संपविण्याचा कट उघडकीस आला आहे. सुदैवाने विद्युत वितरण कंपनीची वांगी आणि तडसर गावची वीज बंद पडल्यामुळे संपूर्ण कुटुंब वाचले आहे.

अशोक निकम हे मंगळवारी पत्नी व दोन मुलांसह  झोपी गेले. रात्री १ वाजता अचानक घरासमोर विजेचा मोठा जाळ झाला व घरातील वीज गेली. घराजवळ ट्रान्सफाॅर्मर असल्यामुळे जाळ झाला असेल असे समजून दुर्लक्ष केले. दुसऱ्यांदा वीज आल्यानंतर पुन्हा जाळ झाल्यामुळे त्यांनी बॅटरीचा उजेड पाडून बाहेर डोकावल्यानंतर त्यांना वीज वाहक तार घराच्या दरवाजाजवळ अडकवलेली दिसली. ती तार ११ केव्ही ट्रान्सफाॅर्मरवरला जोडून करंट दिल्याचे उघडकीस आला.

Web Title: The plot to end the family shocked the whole house